उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांची तात्काळ बदली करा’, तलाठी संघटना आक्रमक
Immediately transfer Deputy Collector Ramdas Jagtap ‘, Talathi organization is aggressive
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed13 Oct 2021,16:30Pm.
कोपरगाव : उपजिल्हाधिकारी संवर्गातील तसेच ‘डीएलआरएमपी’ या डीजीटल प्रणालीचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी अर्वाच्य भाषेचा वापर केल्याचा आरोप तलाठी संघटनांनी केला आहे. कोपरगाव तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. याबाबत सोमवारी संघटनेकडून निवेदन तहसीलदार विजय बोरूडे यांना देण्यात आले आहे
राज्य तलाठी संघटनेकडून हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. याची दखल न घेतल्यास आजपासून आंदोलन तीव्र करू असा इशारा संघटनेने दिला आहे. रामदास जगताप यांची तात्काळ बदली करण्यात यावी यासाठी हे आंदोलन आज सोमवारपासून राज्यभर सुरु करण्यात आले आहे. तलाठी कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष डुबल यांनी दिलेल्या निवेदनावरुन रामदास पाटील यानी चूकीची भाषा वापरली होती त्याचा निषेध म्हणून हे आंदोलन राज्यभर सुरू करण्यात आले आहे. ई पीक पाहणी एप मधील ग्रामीण भागात शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी, तांत्रिक दोष काढून टाकावे, ई-फेरफार मध्ये येत असलेल्या काही तांत्रिक समस्याही तात्काळ दूर कराव्यात अशी मागणीही मंडळ अधिकारी व तलाठी कर्मचारी संघटनेकडून करण्यात आली आहे. जगताप यांनी तलाठी संघटना अध्यक्ष यांना मुर्ख वैगेरे असे गैर व असंसदीय भाषा वापरली म्हणून आम्ही हे आंदोलन करत असल्याचे पत्रकारांजवळ बोलताना सांगितले. या निवेदनावर अध्यक्ष योगेश तांडगे, विश्वनाथ थोरात, संदीप चाकणे, धनंजय पराड, गणेश वाम, बी.एफ. कोळगे, श्रीमती डी.बी. विधाते, पिनल कदम, बी. आर. ठिणगे, एल. जे. सय्यद, गरकल, गोसावी, कळसे आदींच्या सह्या आहेत.