एटीएम कार्डधारकांच्या वारसांना बँकेतर्फे दोन लाखाचे विमा धनादेश

एटीएम कार्डधारकांच्या वारसांना बँकेतर्फे दोन लाखाचे विमा धनादेश

Two lakh insurance checks by the bank to the heirs of ATM cardholders

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed13 Oct 2021,16:50Pm.

कोपरगाव : युनियन बँक कोळपेवाडी शाखेने आपल्या सर्व एटीएम कार्डधारक सभासदांना अपघाती विमा योजना उपलब्ध केली आहे.अशी माहिती शाखा प्रबंधक सुर्यकांत मोडंवे यांनी दिली. या बॅंकेचे खातेदार व सभासद माहेगाव देशमुख रहिवासी मयत शुभम पानगव्हाणे व मढी बु येथिल लक्ष्मण गवळी यांचा नुकताच अपघाती मृत्यू झाला. ते बँकेचे सेव्हिंग एटीएम कार्ड वापरत होते.

बँकेने आपल्या एटीएम कार्डधारक खातेदारांसाठी विमा योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेतंर्गत खातेदार शुभम पानगव्हाणे व लक्ष्मण गवळी यांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाखांचा धनादेशा चे वाटप शाखा प्रबंधक सुर्यकांत मोडंवे यांच्या हस्ते करण्यात आले. नागरिकांनी बँकेत खाते उघडून विमा कवच योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन शाखा प्रबंधक सुर्यकांत मोडंवे यांनी केले आहे. यावेळी सहाय्यक प्रबंधक प्रशांत सर किरण चंद्रे, अजित देवगुणे, सुमित खोकले, अमोल माळी, केशव काकड, यासह मयतांचे वारस सुमित पानगव्हाणे, अरुणा पानगव्हाणे, लता गवळी, उर्मिला गवळी, अशोक गवळी, चंद्रभान गवळी उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page