विजयादशमीला चासनळी भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश ,
BJP workers join NCP on Vijayadashami
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat16 Oct 2021,15:50Pm.
कोपरगाव : आ. आशुतोष काळे यांचा विकासाचा झंझावत पाहुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांची इनकमिंग सुरु असून विजयादशमीला चासनळी येथील भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला , आ.आशुतोष काळे यांनी स्वागत केले आहे.
दोनच वर्षात मतदार संघातील विकासाचे बहुतांशी प्रश्न मार्गी लावले आहे. त्यामुळे सद्यस्थितीला कोणत्याही प्रकारच्या निवडणुका नसतांना देखील मागील काही महिन्यांपासून विरोधी पक्षातील कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये दाखल होत आहेत. चासनळी येथील भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते भगीरथ गाडे, गणपतराव गाडे, संजय गाडे, धनंजय गाडे, मदन गाडे, बाळासाहेब गाडे, प्रसाद गाडे, मुकुंद गाडे, अक्षय गाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, संचालक सचिन चांदगुडे, सोमनाथ चांदगुडे, दिलीपराव चांदगुडे, संदीप जाधव, सुनील गाडे, गणेश आहेर आदी उपस्थित होते. यावेळी भगीरथ गाडे म्हणाले की, आ.आशुतोष काळे यांनी कधीही कुणाची फसवेगिरी न करता राजकारणात दिलेला शब्द पाळणे ही काळे परिवाराची जिल्ह्यात नव्हे तर राज्यात वेगळी ओळख आहे. कार्यकर्त्यांना योग्य सन्मान देणे हा आ. आशुतोष काळे यांचा स्थायी स्वभाव आहे. निस्वार्थी जनसेवेचा वसा घेतलेल्या आ. आशुतोष काळे यांच्यासारख्या नेतृत्वाच्या अधिपत्याखाली काम करण्यासाठी अंतर्मनाने प्रवृत्त केले. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे .





