उपपदार्थ निर्मितीवरच साखर उद्योगाचे भवितव्य -शंकरराव कोल्हे

उपपदार्थ निर्मितीवरच साखर उद्योगाचे भवितव्य -शंकरराव कोल्हे

The future of the sugar industry depends on the production of by-products – Shankarrao Kolhe

साखर उद्योगाबाबत ब्राझीलप्रमाणे  उत्पादनानुरूप धोरण ठरविले जावेIn the case of the sugar industry, a product-oriented policy should be decided like in Brazil

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat16 Oct 2021,15:30Pm.

कोपरगांव : ब्राझीलमध्ये उत्पादनानुरूप धोरण ठरविले जाते, त्याचप्रमाणे आपल्याकडे साखर व इथेनॉल उत्पादनांत साखर कारखानदारिची धोरणे तात्काळ घेऊन हा उद्योग व त्यावर अवलंबून असणारी व्यवस्था टिकवावी,उपपदार्थ, औषध, बायोगॅस निर्मितीवर भर द्यावा तरच भविष्यात हा उद्योग तग धऊ शकेल,असे मत उद्योगातील तज्ञ व माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे बॉयलर प्रज्वलन प्रसंगी व्यक्त केले.

२०२१ राज्यात १८१ साखर कारखाने असुन त्यापैकी फक्त २५ साखर कारखाने सुस्थीतीत आहे अन्य कारखान्यांची स्थिती हलाखीची आहे, सहकाराने ग्रामीण भागातील विकासाचा चेहरा बदलला आहे; पण सहकाराला आता खाजगीचे धक्के बसु लागले आहे.आम्ही खाजगीशी दोन हात केले पण आता पुन्हा खाजगीचेच आव्हान सहकारी साखर कारखानदारी समोर उभे राहिले आहे. बाझीलमध्ये १७ टक्के साखर उतारा मिळतो. त्यामुळे तेथे साखर उद्योगातील खर्चाचा ताळमेळ बसतो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्याने सुद्धा जादा साखर उतारा देणाऱ्या ८६०३२ तसेच ११०१५ आदी उसाचीच लागवड करावी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने कमी मनुष्यबळात साखर कारखाने चालविण्याचे तंत्र अवगत झाल्याने त्याचाही येथील कारखानदारीने विचार करावा, कारखान्यांत तयार झालेले साखर पोते १८० दिवस सांभाळायचे म्हटले तर प्रती पोत्यावर ३६० रुपयांचा व्याजाचा भुर्दंड साखर कारखानदारांना सोसाव लागतो. एफआरपी तुकडे करून देता येत नाही. सभासद , शेतकऱ्यांना उस गळीताचे पैसे तात्काळ द्यावेच लागतात. केंद्र शासन मदत करतो, राज्य शासन मदत करत नाही, ही पस्थितीती बदली जावी.

चौकट

ब्राझीलमध्ये चालुवर्षी दुष्काळ आहे. त्यामुळे तेथे साखरेचे उत्पादन कमी होईल. भारतीय बाजार सहकारी साखर कारखान्यांना ही संधी चालून आली आहे. केंद्र शासन मदत करतो, राज्य शासन मदत करत नाही, ही पस्थितीती बदली जावी. 

Leave a Reply

You cannot copy content of this page