कायद्यात सुधारणा करून आयकराचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा – आ. आशुतोष काळे
The issue of income tax should be solved permanently by amending the law. Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir15 Oct 2021,19:00Pm.
कोपरगाव : खाजगी कारखान्याप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा केलेली रक्कम व्यावसायिक खर्च म्हणून ग्राह्य धरणे संदर्भात कायद्यामध्ये योग्य ती सुधारणा करून आयकराचा प्रश्न केंद्र शासनाने कायमस्वरूपी मार्गी लावावा अशी मागणी चेअरमन आ. आशुतोष काळे यांनी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे ६७ व्या बॉयलर प्रदीपन प्रसंगी केली आहे.

यावेळी विक्रमी ऊस उत्पादक शेतकरी आप्पासाहेब पुंजाजी आगवन व सौ. सुवर्णा आगवन, पांडुरंग कारभारी सांगळे व सौ. सरूबाई सांगळे तसेच आण्णासाहेब लक्ष्मण पानगव्हाणे व सौ. निर्मला पानगव्हाणे या उभयतांच्या हस्ते विधिवत पूजा करून बॉयलर प्रदीपन माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
आ आशुतोष काळे म्हणाले की, सदर आयकराचा विषय जुना असून त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या. दि. ५ मार्च २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देवून संबधित असेसिंग ऑफिसर यांनी (Faceless Assessment) करून पूर्वी प्रमाणेच ऑर्डर केलेली आहे. त्यासंदर्भात साखर संघामार्फत केंद्र शासनाकडे पत्रव्यवहार केलेला आहे. आयकराचा हा प्रश्न मार्गी लावावा यासाठी शरद पवार यांनी स्वत: लक्ष घालावे याबाबत त्यांच्याकडे आग्रह धरणार आहे.
गाळप उद्दिष्टाइतका ७.०० लाख मे.टन उस उपलब्ध होईल असा शेतकी विभागाचा अंदाज आहे.
व्हा.चेअरमन सुधाकर रोहोम, कार्यकारी संचालक गिरीश जगताप, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, आसवणी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी एस. डी. शिरसाठ तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचलन जनरल मॅनेजर सुनील कोल्हे यांनी केले तर व्हा. चेअरमन सुधाकर रोहोम यांनी आभार मानले.
चौकट :- साखर कामगारांना
माहे ऑक्टोंबर २०२१ पासून वेतनवाढ देणारा कर्मवीर शंकरराव काळे कारखाना राज्यात पहिला ठरला आहे. त्याबद्दल कोपरगाव साखर कामगार सभेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
Post Views:
326





