गुरु शुक्राचार्यांचे आमदार राधाकृष्ण विखेंनी घेतले सपत्नीक दर्शन
Guru Shukracharya’s MLA Radhakrishna Vikhen took Saptnik Darshan
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat16 Oct 2021,18:20Pm.
कोपरगाव : शहरानजीक असलेल्या बेट भागातील परमसद्गुरु गुरु शुक्राचार्य मंदिरास आमदार राधाकृष्ण विखे त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे यांनी आज सपत्नीक भेट दिली .
गुरु शुक्राचार्य यांचे दर्शन घेतले. त्यांचा प्रसाद देऊन यथोचित सत्कार मंदिराचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी करून स्वागत केले.
जगातील एकमेव मंदिर असलेल्या गुरु शुक्राचार्य मंदिराची महती विशद केली .आमदार राधाकृष्ण विखे यांनी दर्शन घेऊन व मंदिराचे जुने बांधकाम पाहून अतिशय प्रसन्न झाल्याची भावना व्यक्त केली. याप्रसंगी गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे उपस्थित होते .या मंदिरात बारा महिने अठरा काळ कधीही शुभविवाह लावला जातो. आज संवत्सर येथील प्रगतशील शेतकरी एस. एल. परजने यांच्या मुलीचे मुलाचे लग्न साध्या पद्धतीने शुक्राचार्य मंदिरात होते .
या लग्नास विखे दांपत्यासह संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे कार्यकारी संचालक शिवाजीराव दिवटे संजीवनी एज्युकेशन संस्थेचे विश्वस्त अमित कोल्हे आदींसह ५० लोकांचे उपस्थित हा विवाह साध्या पद्धतीने सोशल डिस्टंसिंग पाळून संपन्न झाल्याची माहिती श्री आव्हाड यांनी दिली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंतराव थोरात यांनी केले आभार सचिन परदेशी यांनी मानले. मुन्ना आव्हाड प्रसाद प-हे यांचेसह समिती सदस्य उपस्थित होते.





