आरोग्य शिबिरातुन आरोग्य अबाधित ठेवा – आ. आशुतोष काळे          

आरोग्य शिबिरातुन आरोग्य अबाधित ठेवा – आ. आशुतोष काळे

  Keep health intact from health camps –  Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir 22 Oct 2021,20:30Pm.

 कोपरगाव : आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेवून आपले आरोग्य अबाधित ठेवावे असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी  प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आर्यन ग्रुप व संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल यांच्या मोफत सर्वरोग निदान शिबिरात केले.

आ.  काळे म्हणाले, आर्यन ग्रुपने नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासून सामाजिक उपक्रम राबविले आहे त्याबद्दल सदस्यांचे कौतुक केले.  विकासाच्या अनेक समस्या आहेत. या समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत तुमच्या प्रभागातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक निवडून द्या. विकासाची जबाबदारी मी घेतो व तुमच्या प्रभागाच्या विकासाच्या समस्या सोडविण्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देईल अशी ग्वाही दिली.                   

यावेळी नगरसेवक मंदार पहाडे,  सुनील शिलेदार, रमेश गवळी, फकीर कुरेशी, दिनकर खरे, बाळासाहेब रुईकर, आर्यन ग्रुपचे संस्थापक जावेद शेख.

Leave a Reply

You cannot copy content of this page