आवर्तनाचे नियोजन करा, -आ. आशुतोष काळे 

आवर्तनाचे नियोजन करा, -आ. आशुतोष काळे

Plan the Aavaratan, – Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir 22 Oct 2021,20:40Pm.

कोपरगाव :नासिक धरण क्षेत्रातील सर्व धरणे समाधानकारक भरलेली आहेत. त्यामुळे गोदावरी कालव्यांना रब्बी व उन्हाळी जास्तीत जास्त आवर्तन कसे देता येईल याचे योग्य नियोजन करा. डाव्या व उजव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी मंजूर असलेल्या ५५ कोटी रुपये निधीपैकी ४२ कोटी रुपये निधीला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. कालव्यांच्या दुरुस्तीच्या निविदा लवकरात लवकर प्रसिद्ध करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत दिल्या.

 या बैठकीत देण्यात येणाऱ्या रब्बी व उन्हाळी आवर्तना बरोबरच गोदावरी कालव्यांच्या इतर प्रश्नांबाबत देखील त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी कर्मवीर काळे  कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक पद्माकांत कुदळे, कारभारी आगवन, सोमनाथ चांदगुडे, आण्णासाहेब कोते, राजेंद्र खिलारी, तुषार विध्वंस, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, एम.बी. गायकवाड, टी. के. थोरात, ओ. ए. भंडारी, एस.के. मिसाळ, एस.डी. ससाणे, बी.आर. पवार, एस.एच.नागरे, कोपरगाव नगरपरिषदेच्या श्रीमती पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.

 आ. आशुतोष काळे म्हणाले की, शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने आवर्तनाचा लाभ मिळावा यासाठी  कालव्यांच्या चाऱ्या उकरून घ्या. रब्बी व उन्हाळी आवर्तनांच्या तारखांचे नियोजित वेळापत्रक तातडीने तयार करून ७ नंबर फॉर्म भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी योग्य नियोजन करावे. पुणतांबा बंधाऱ्याच्या कठडे दुरुस्तीसाठी तातडीने कार्यवाही करा, वितरिका दुरुस्ती करतांना हेड टू टेल करण्यात यावी, पोहेगाव येथे कालव्यावर पाणी मोजमापक बसविल्यामुळे प्रचंड दाब येवून गळ गळती ची दखल घेऊन दुरुस्ती करा कोपरगाव शहराची पाणीपट्टी घरगुती दराने आकारा,   आदी सूचना आ. आशुतोष काळे यांनी यावेळी उपस्थित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. 

Leave a Reply

You cannot copy content of this page