ज्यांचे कार्य असते त्यांचेच पुतळे उभारले जातात – आ.आशुतोष काळे

ज्यांचे कार्य असते त्यांचेच पुतळे उभारले जातात – आ.आशुतोष काळे

Statues are erected for those who have work – MLA Ashutosh Kale

कर्मवीर शंकरराव काळे पूर्णाकृती पुतळा भूमिपूजन Karmaveer Shankarrao Kale Full Statue Bhumi Pujan

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir 5 Nov.2021,18.50Pm.

कोपरगाव: कर्मवीर शंकरराव काळे यांचा पुतळा त्यांच्या कार्याचे आपण केलेल्या गौरवाचे प्रतीक आहे.ज्यांचे कार्य असते त्यांचेच पुतळे उभारले जातात असे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी शुक्रवारी (५ नोव्हेंबर) रोजी पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणात कर्मवीर शंकरराव काळे यांच्या ९ व्या पुण्यस्मृतिदिनी पूर्णाकृती पुतळ्याच्या भूमिपूजन व कार्यकर्ता गौरव कार्यक्रमात केले. अध्यक्षस्थानी छबुराव आव्हाड होते.तर माजी आमदार अशोक काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ.आशुतोष काळे म्हणाले,कर्मवीर शंकरराव काळे स्मृतिस्थळाच्या उभारणी मधून येणाऱ्या युवा पिढीला एक प्रेरणा मिळावी म्हणुन हा पुतळा आपण या ठिकाणी उभारतो आहे. त्यांच्या कार्यात आपल्या सर्वांचे सहकार्य राहिले आहे. म्हणून आपला गौरव करणे मी माझे कर्तव्य समजतो, परंतु वेळेअभावी सर्वांचा गौरव करता आला नाही, म्हणूनच आपले शाब्दिक आभार मानतो. कारण जेवढे काम बाबांनी केलं आपणा सर्वांची साथ त्यांना होती म्हणून ते काम बाबा करू शकले, असे मी मानतो. म्हणून त्यांच्या या कार्यात आपल्या सर्वांचा मोलाचा वाटा आहे. पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये आपण हा पुतळा उभारतो पंचायत समितीत ग्रामीण भागातील लोक त्यांची कामे करण्यासाठी या ठिकाणी येतात पलीकडे तहसील कार्यालयात देखील ग्रामीण व शहरी भागातील सर्वच लोक या ठिकाणी येत असतात म्हणुन स्मृतीस्थळापासून पुढच्या पिढीला आपणा सर्वांना या ठिकाणी प्रेरणा मिळावी, त्यांच्या कार्याची माहिती व्हावी, कारण की पुतळे कोणाचेही उभारले जात नाही कोणाचे काहीतरी काम असते म्हणून अशा व्यक्तींचे पुतळे या ठिकाणी उभारले जातात. असे ते म्हणाले

पंचायत समिती प्रांगणात कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल जेष्ठ कार्यकर्त्यांचे आभार मानतांना आ. आशुतोष काळे.

आ.काळे म्हणाले, या पुतळा उभारणीच्या कार्यामध्ये कर्मवीर काळे मित्र मंडळाचे सर्व सदस्य असतील पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल राज्य शासनातील ग्रामविकास विभाग असेल त्यांनी त्याला मान्यता दिली. आणि त्यामुळे आज या ठिकाणी आपण ज्या पुतळ्याची उभारणी करीत आहोत. याबद्दल मी या सर्वांचे मनापासून आभार मानतो. स्मृती स्थळापासून पुढच्या पिढीला आपणा सर्वांना या ठिकाणी प्रेरणा मिळावी अशी अपेक्षा करतो, आपण जे काही सहकार्य, मार्गदर्शन व प्रेम कर्मवीर शंकरराव काळे यांच्यावर ठेवलं त्याचबरोबर पुढची पिढी म्हणजे माजी आमदार अशोक काळे यांच्यावरही ठेवलं, आपल्याकडं मी एवढीच अपेक्षा करतो की, येणाऱ्या काळामध्ये तेच सहकार्य, प्रेम व मार्गदर्शन मला देखील राहू द्यावं, एवढी या ठिकाणी मी विनंती करतो. आमचा काळे परिवार आपल्या सर्वांच्या ऋणांमध्ये राहू इच्छितो, अशा शब्दात त्यांनी आपल्या मनोगताचा समारोप केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कर्मवीर काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी पाटील आगवण यांनी केले.
यावेळी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, गौतम सहकारी बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, नगराध्यक्ष विजय वहाडणे, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, राजेंद्र जाधव, कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण, पद्माकांत कुदळे, सुधाकर आवारे, कैलासशेठ ठोळे, विजय बंब,प्रशांत वाबळे, पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, सर्व संचालक मंडळ, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक आदी मान्यवरांसह कर्मवीर शंकरराव काळे यांच्या समवेत सामाजिक योगदान देणारे जेष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे यांच्या सामाजिक, राजकीय वाटचालीत त्यांच्या समवेत सामाजिक योगदान देणाऱ्या जेष्ठ कार्यकर्त्यांचा आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.
सूत्रसंचालन गोरक्षनाथ चव्हाण सर यांनी केले. तर शेवटी आभार नारायणराव मांजरे यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page