सात गावांना खुल्या व्यायामशाळा तर २० गावांना सौरमिनी हायमॅक्स – आ. आशुतोष काळे
Open gymnasiums for seven villages and Solarmini Himax for 20 villages. Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat 6 Nov.2021,18.30Pm.
कोपरगाव : जिल्ह्याचे पालक मंत्री तथा ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी कोपरगाव तालुक्यातील ७ गावांना खुल्या व्यायामशाळा, तर २० गावांसाठी सौरमिनी हायमॅक्स लॅम्प मंजूर केले असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
याविषयी अधिक माहिती देताना आ. आशुतोष काळे म्हणाले, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे योजने अंतर्गत कासली, तळेगाव मळे, मळेगाव थडी, मायगाव देवी, सांगवी भुसार, वडगाव आणि टाकळी या सात गावांसाठी खुल्या व्यायाम शाळा तर सोनारी, बक्तरपूर, चासनळी, मायगावदेवी, पोहेगाव, वेस, जेऊर कुंभारी, रांजणगाव देशमुख, भोजडे, लौकी, घोयेगाव, संवत्सर, जेऊर पाटोदा, मुर्शतपूर, हिंगणी, डाऊच बु., ओगदी, अंचलगाव, पढेगाव, सावळगाव या २० गावांसाठी सौरमिनी हायमॅक्स मंजुर झाले आहेत. राहिलेली मागणी देखील लवकरच पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.





