कामे आम्ही करतो परंतु पत्रके मात्र गडावरून निघतात – आ. आशुतोष काळे

कामे आम्ही करतो परंतु पत्रके मात्र गडावरून निघतात – आ. आशुतोष काळे

We do the work but the sheets come out of the fort. Mla. Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir 12 Nov.2021,17.00Pm.

कोपरगाव: राज्यातील महा विकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून कोरोना काळातही  दोन वर्षात  पाठपुराव्यातून विकास कामे केली, असे असतानाही कामे आम्ही करतो अशी पत्रके मात्र गडावरून निघतात अशी मिश्कील  टीका आमदार आशुतोष काळे यांनी केली, आजच्या रस्त्याच्या भूमिपूजनाचा चे पत्र गडावरून आल्यास  नवल वाटू देऊ नका असा टोलाही त्यांनी लगावला .

 रामा. ७ देर्डे चांदवड फाटा ते भरवस फाटा पाच किमी रस्ता २ कोटी ५० लक्ष, निधीतून देर्डे चांदवड ते शिलेदार वस्ती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण १५ लाख, २ झेडपी शाळा खोल्या १७ लाख, भूमिपूजन व  लोकार्पण नुकतेच आ. आशुतोष काळे यांनी केले.
आ.आशुतोष काळे म्हणाले,  एखाद्या कार्यक्रमात मंत्र्यांला भेटायचे व आम्हीच केल्याच्या गडावरून बातम्या प्रसिद्ध करायच्या हे  एककलमी कार्यक्रमाचे फंडे जुने झाले आहेत. विकास कामे ही निवेदने पत्रके देऊन होत नाही तर त्यासाठी पाठपुरावा करून  तांत्रिक मंजुरी आणाव्या लागतात असे असताना विरोधक मात्र श्रेय घेण्याचा  केविलवाणे प्रयत्न करतात असा आरोपही त्यांनी केला.
यावेळी  सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे,  कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक सुनील शिंदे, आनंदराव चव्हाण, काकासाहेब जावळे,कारभारी आगवन, बबनराव शिलेदार, पं.स. सदस्य श्रावण आसने, रोहिदास होन, राहुल रोहमारे, राहुल जगधने, एम.टी. रोहमारे, रा. यु. काँच्या तालुकाध्यक्षा सौ. वैशाली आभाळे  जवळके सरपंच बाबुराव थोरात, देर्डे चांदवड सरपंच प्रतिभा गायकवाड, उपसरपंच शकुंतला कोल्हे, मढी बु. सरपंच प्रविण निंबाळकर, शहाजापूर सरपंच सचिन वाबळे, देर्डे कोऱ्हाळे सरपंच योगीराज देशमुख, सोनेवाडी सरपंच गंगाधर खोमणे, चांगदेव होन, बाबुराव कोल्हे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, सा. बां.चे उपकार्यकरी अभियंता प्रशांत वाकचौरे, उपअभियंता एन.जी. गायकवाड, ग्रामसेवक एस.टी. रहाणे आदींसह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.
 चौकट :- 
देर्डे फाटा ते भरवस फाटा हा २९ किलोमीटर चा रस्ता आशियायी विकास बँकेच्या माध्यमातून देखील प्रस्तावित आहे. त्याचा डीपीआर मंजूर झालेला आहे. २९ किलोमीटर पर्यत असलेल्या या रस्त्यासाठी १३० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. झगडे फाटा ते वडगाव पान रस्ता देखील प्रस्तावित असून त्या रस्त्याला देखील १३० ते १५० कोटी खर्च अपेक्षित आहे. तो रस्ता देखील ११ मीटर रुंद  होणार आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात या रस्त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी पाठपुरावा सुरु आहे. हा रस्ता रुंद करण्याचे मा.आ. अशोकराव काळे यांचे स्वप्न मीच पूर्णकरणार.– आ. आशुतोष काळे

Leave a Reply

You cannot copy content of this page