एकीतून गावाचा विकास साधा – विवेक कोल्हे
Develop the village through one – Vivek Kolhe
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir 12 Nov.2021,16.30Pm.
कोपरगांव : सर्वांनी एकी ठेवुन गावचा विकास साधावा त्यातुन प्रगतीचे शिखर गाठावे असे प्रतिपादन कोपरगांव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी पंधराव्या वित्त आयोगातून नाटेगाव येथील ३लाख ८० हजार रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी केले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठनेते व प्रगतशिल शेतकरी दत्तात्रय कोल्हे होते.
तालुक्यातील नाटेगांव येथे पंधराव्या वित्त आयोगातुन स्मशानभूमी (१ लाख ५० हजार), दलित वस्ती अंतर्गत मोठेबाबा मंदिर (८० हजार), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (१ लाख ५० हजार) परिसरात पेव्हींग ब्लॉक बसविण्यांच्या कामाचे भूमिपुजन, क्रीडा साहित्य, ग्रामपंचायत सेस पाच टक्के फंडाअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना किराणा किटचे वाटप, जयकिसान ॲग्रो दुकानाचा शुभारंभ व सहकारमहर्षि कोल्हे कारखान्याने बांधलेल्या नाटेगाव बंधा-यात पाणी साठवण्यांसाठी नव्याने फळया बसविल्याने साठलेल्या पाण्यांचे जलपुजन केले. प्रारंभी डी. पी. मोरे व डॉ. गोरक्षनाथ मोरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सरपंच विकास मोरे यांनी गांवच्या विकासकामांची माहिती दिली. उपसरपंच ताराचंद मोरे व भायुमोर्चाचे तालुका उपाध्यक्ष अनुराग येवले यांनी माहिती दिली. माजी गटनेते केशव भवर, निवृत्ती बनकर, भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, बाबुराव मोरे, रामदास मोरे, जयराम मोरे, अशोक मोरे, गणेश मोरे, राजेंद्र आप्पासाहेब मोरे यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी कार्यकर्ते व पंचक्रोशीतील युवक मोठया संख्येने उपस्थित होते.
विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगांव विधानसभा मतदार संघाचे रस्ते, वीज, पाणी, आरोग्य आदि विकासाचे प्रश्न घेवुन त्याच्या निधीसाठी मंत्रालयस्तरापर्यंत पाठपुरावा केला तर संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली गोदावरी डाव्या आणि उजव्या, पालखेड कालव्या अंतर्गत तर पुर्व पश्चिम भागातील दुष्काळी टापूला पाण्याची समृध्दी निर्माण करण्यासाठी गावतळी, मातीचे, दगडीसाठवण, कोल्हापूर पध्दतीचे, गोडबोले गेटचे बंधारे बांधुन जलसंवर्धन केले. कार्तिक मोरे यांनी आभार मानले.





