पाच नंबर तलावाच्या तांत्रिक मंजुरीवर सर्वसाधारण सभेत निर्णय व्हावा 

पाच नंबर तलावाच्या तांत्रिक मंजुरीवर सर्वसाधारण सभेत निर्णय व्हावा

The general meeting should decide on the technical approval of lake number five

भाजप-सेना नगरसेवकांची मागणी Demand of BJP-Sena corporators

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon22 Nov.2021 17.30Pm.

कोपरगाव: तलाव क्रमांक ५ करीता मिळालेल्या तांत्रीक मंजुरीनुसार संपुर्ण प्रकल्प अहवाल पालिका सभागृहात नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवुन त्यावर निर्णय व्हावा अशी मागणी सत्ताधारी भाजप शिवसेना नगरसेवकांनी नगराध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे सोमवारी २२ रोजी केली आहे.

शहराची पाणीटंचाई लक्षात घेता पाच नंबर साठवण तळयासाठी आम्ही सर्व नगरसेवकांनी प्रशासकीय व तांत्रीक मान्यतेकरीता लागणारे सर्व ठराव नगरपरिषदेत वेळोवेळी बहुमताने मंजुर केलेले आहेत.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रीक मंजुरी देवुन त्यात निळवंडे शिर्डी कोपरगांव या बंदिस्त संयुक्त पाणी पुरवठा योजनेकरीता कोपरगाव नगरपरिषदेस वगळण्यात यावे व तसेच निळवंडे धरणावरील कोपरगांव नगरपरिषदेस मंजुर असलेले धरणावरील आरक्षण रदद करण्यांत यावे अशा चार व पाच या दोन जाचक अटी घातल्या आहे, त्या शहरवासियांच्या भवितव्याच्यादृष्टींने अडचणीच्या असल्याने त्या वगळण्यांत याव्या व तांत्रीक मंजुरी संदर्भात सविस्तर अहवाल सादर करून तो पालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवून त्यावर निर्णय करावा असे निवेदनात नमूद केले आहे.

कोपरगांव शहरालगत अनेक महाविद्यालये, सहकारी साखर कारखाने, औद्योगिक वसाहत, नव नवीन उपनगरे, नव्यांने निर्माण झालेला नागपुर मुंबई समृध्दी महामार्ग तसेच आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र श्री साईबाबा संस्थान येथे दर्शनाकरीता अनेक भाविकांची कोपरगांव रेल्वेस्टेशन येथे ये जा चालु असते., तसेच कोपरगांव शहरास कोपरगांव ग्रामिण भाग (त्रिशंकु भाग) नव्यांने जोडण्यांत आला आहे, म्हणजेच याचा अर्थ असा आहे की, कोपरगांव शहराचे विस्तारीकरण मोठया प्रमाणांत वाढत आहे. त्याअनुषंगाने कोपरगांव शहरातील नागरिकांना पिण्यांचे पाण्यांसाठी निळवंडे धरणावर सर्व शासकीय मंजुरीनुसार आरक्षीत असलेले पिण्यांचे पाण्यांचे आरक्षण हे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरणार आहे.त्याअनुषंगाने कोपरगांव शहरातील नागरिकांना पिण्यांचे पाण्यांसाठी निळवंडे धरणावर सर्व शासकीय मंजुरीनुसार आरक्षीत असलेले पिण्यांचे पाण्यांचे आरक्षण हे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरणार आहे. नगरपरिषदेचा समावेश वगळु नये, नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवुन त्यावर निर्णय व्हावा असे शेवटी म्हटले आहे.

निवेदनावर भाजपा गटनेते रविंद्र पाठक, सेनेचे गटनेते योगेश बागुल, उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष अरिफ कुरेशी, स्वप्निल निखाडे शिवाजी खांडेकर व सर्व भाजपा सेना नगरसेवकांच्या सहया आहेत. 

Leave a Reply

You cannot copy content of this page