कोपरगांव पालिका फंड व चौदाव्यावित्त आयोगातील विकास कामे सुरू करा;

कोपरगांव पालिका फंड व चौदाव्यावित्त आयोगातील विकास कामे सुरू करा;

Start development work in Kopargaon Municipal Fund and 14th Finance Commission;

भाजपा शिवसेना नगरसेवकांचे निवेदनStatement of BJP Shiv Sena corporators

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon22 Nov.2021 17.40Pm.

  कोपरगांव: कोपरगांव पालिका फंड व चौदाव्यावित्त आयोगातील विकास कामे माधुरीने तातडीने सुरू करावीत या मागणीचे निवेदन शिवसेना-भाजप नगरसेवकांनी  सोमवारी (२२) रोजी भाजपा गटनेते रविंद्र पाठक, सेनेचे गटनेते योगेश बागुल, कैलास जाधव, उपनगराध्यक्ष अरिफ कुरेशी व सर्व नगरसेवकांनी  नगराध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिले.

  या निवेदनांत पुढे म्हटले आहे की, पालिका सभागृह व सर्वसाधारण सभेसह अन्य विशेष सभेत भाजपा शिवसेना गटनेत्यासह सर्व नगरसेवकांनी बहुसंख्य विकास कामांना मंजु-या दिलेल्या आहेत, ही कामे अजुनही सुरू झालेली नाही त्याबाबत शहरवासियांनी याकामी आमच्याकडे अनेकेवेळा पाठपुरावा केलेला आहे, ही विकासकामे सुरू व्हावीत म्हणून नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याशी देखील चर्चा केलेल्या आहेत तेंव्हा जनतेच्या जिव्हाळयाशी निगडीत विशेष रस्ते, चौदाव्या वित्त आयोग व पालिका फंडातील कामांना तात्काळ सुरूवात करून ही कामे दर्जेदार होणेबाबत संबंधीत यंत्रणेस आदेश करावे असे निवेदनात नमूद केले आहे श्री. रविंद्र पाठक, उपनगराध्यक्ष अरिफ कुरेशी, योगेश बागुल शिवाजी खांडेकर व अन्य नगरसेवकांनी समक्ष भेट घेवुन चर्चा केली आहे.  

Leave a Reply

You cannot copy content of this page