गावांच्या पाणीपुरवठा योजना बाबत प्रधान सचिवांशी सकारात्मक चर्चा- आ. आशुतोष काळे
Positive discussion with Principal Secretary regarding village water supply scheme. Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu25 Nov.2021 19.20Pm.
कोपरगाव : तालुक्यातील अनेक गावातील पाणीपुरवठा योजनांच्या सर्वेक्षणानंतर या योजनेला तातडीने मंजुरी मिळावी यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांची भेट घेतली असून त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
याविषयी अधिक माहिती देतांना आ. काळे म्हणाले कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी, सुरेगाव, कुंभारी, वारी-कान्हेगाव, मळेगाव थडी, मायगाव देवी, जेऊर कुंभारी व शिंगणापूर या गावातील सर्वच पाणीपुरवठा योजना रुपये ५ कोटीच्या पुढे असल्यामुळे या योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे वर्ग केल्या आहेत. मात्र या योजनांना तातडीने मंजुरी मिळावी यासाठी आपण प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांची भेट घेतली. जावळीत यांच्याशी झालेल्या चर्चेत वरील गावाबरोबरच जिल्हा परिषदेकडे असणाऱ्या अजूनही सर्वच गावांच्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी तातडीने मंजुरी मिळावी अशी मागणी केली. या सर्व मागण्यांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कारवाई करण्याची ग्वाही दिल्याचेही त्यांनी सांगितले
चौकट
मागील आठवड्यात एका कार्यक्रमात ग्रामस्थांनी मागील काही वर्षापासून रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांचे गाऱ्हाणे त्यांच्यापुढे मांडले होते. त्यावेळी या पाणी योजनांचा प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द आ.आशुतोष काळे यांनी दिला होता. त्या संदर्भातच यांनी प्रधान सचिवांची भेट घेतली आहे सकारात्मक प्रतिसादामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.