कोपरगाव बसस्थानक रस्त्याच्या च्या बाजूने दुमजली गाळे बांधा – विजय वहाडणे

कोपरगाव बसस्थानक रस्त्याच्या च्या बाजूने दुमजली गाळे बांधा – विजय वहाडणे

Kopargaon Bus Stand Build a two-story carpet along the road – Vijay Vahadne

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu25 Nov.2021 19.00Pm.

कोपरगाव : शहरातील राज्य परिवहन विभागाचे नविन बसस्थानक चे काम पुर्णत्वास जात आहे. कोपरगाव शहरातील या बस स्थानकाच्या जागेत पण रस्त्यालगत ८ × ८ (फुट) चे गाळे (खाली व वर) दुमजली गाळे बांधण्यात यावे अशी मागणी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी परिवहन मंत्री नामदार अनिल परब यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

विजय वहाडणे म्हणाले,कोपरगाव शहरामध्ये अत्याधुनिक असे कोपरगाव बस स्थानक उभारण्यात येत असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. व्यावसायिक गाळे संगमनेर व सिन्नर बस स्थानकात व इतर ठिकाणी बांधलेले आहेत. कोपरगाव बस स्थानकाची असे गाळे बांधण्यासाठी जागाही उपलब्ध असल्याने बस वाहतुकीला कुठलाही अडथळा होणार नाही. तेंव्हा बस स्थानकाच्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या जागेत दोन मजली गाळे बांधण्यात जावे जेणेकरून कोपरगाव शहरातील छोटे व्यावसायिक व निवृत्त एस. टी. कर्मचाऱ्यांना सदरचे गाळे अनामत रक्कम घेऊन भाड्याने दिले तर शहरातील अनेकांना रोजगार मिळून राज्य परिवहन महामंडळाचे उत्पन्नही वाढू शकते. असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

चौकट

कोपरगाव शहरातील अनेक रस्त्यांलगत व्यावसायिक गाळे-खोका शॉप बांधण्यासाठी आम्ही नगररचना विभागाकडे अनेकदा परवानगी मागितली,पण शासन तशी परवानगी द्यायला तयार नाही. अशी खंतही वहाडणे यांनी पत्रात व्यक्त केली आहे

Leave a Reply

You cannot copy content of this page