कोपरगांवची जनता त्रस्त, लोकप्रतिनिधी जेसीबीने गुलाल उधळण्यांत मस्त -स्नेहलता कोल्हे.

कोपरगांवची जनता त्रस्त, लोकप्रतिनिधी जेसीबीने गुलाल उधळण्यांत मस्त -स्नेहलता कोल्हे.

The people of Kopargaon are suffering People’s Representative Cool in Gulal scattering-Snehalta Kohle

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue30 Nov.2021 16.50Pm.

कोपरगांव : गेल्या दोन वर्षात कोरोना, खरिप पिकाचे नुकसान,आता रब्बीच्या पाण्याचा खेळखंडोबा, एसटी कर्मचारी हवालदिल, रेशनकार्ड, डोल, आपत्तीग्रस्त, दिव्यांग आदि शासकीय योजना लाभार्थ्यांच्या प्रश्नांना कुणींही वाली राहिलेले नाही, एकीकडे महाविकास आघाडीचे सरकार जनतेला नागवत आहे. तर दुसरीकडे कोपरगांवची जनता त्रस्त असताना दोन वर्षपूर्ती निमित्त करून लोक प्रतिनिधी मात्र जेसीबीने गुलाल उधळण्यांत मस्त असल्याची जोरदार टीका भाजप प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी जेऊर कुंभारी येथे एका कार्यक्रमात केली.

मंगळवारी ३० नोव्हेंबर रोजी सौ. स्नेहलता कोल्हे यांनी जेउरकुंभारी येथे १ कोटी ५४ लाख ४५ रुपये निधीतील कामांचे लोकार्पण केले.अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात होते. सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, पर्जन्यमान बरे आहे, विहीरींना पाणी आहे, अति पावसामुळे खरीपाची वाट लागली, रब्बी पीकाचे नियोजन पत्नीचे दागिने गहाण ठेवुन केले, विहिरींना पाणी आहे तर अनेक ठिकाणची वीज रोहित्र जळालेली आहेत. गावोगावच्या पाणी योजनांची वाट लागली,एकीकडे पाण्याचे आवर्तन मिळत नाही, दुसरीकडे वसुलीसाठी रोहित बंद करून वीज कापली जाते.शेतकऱ्यांना त्रास देण्याची भूमिका तीन तिघाडे चे सरकार करीत आहे.याबद्दल लोकप्रतिनिधी मात्र चकार शब्द काढायला तयार नाही, त्यांना सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायला वेळ नाही, मतदार संघातील रस्त्यांची वाट लागली आहे,मात्र इकडे विकासाचा डांगोरा पिटला जातो, अशी टिकाही कोल्हे यांनी केली. स्वागत उपसरपंच जालींदर चव्हाण व प्रदिप गायकवाड यांनी केले. सरपंच सौ. सुवर्णा सतिष पवार यांनी प्रास्तविक केले. कोल्हे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब वक्ते माजी सभापती शिवाजीराव वक्ते, रिपाईचे राज्य सचिव दिपक गायकवाड, यांनी मनोगते व्यक्त केली याप्रसंगी अरूण येवले, मधुकरराव वक्ते, केशव होन, विठठलराव आव्हाड, सतिष आव्हाड, रमेश वक्ते, शिवाजी यादवराव वक्ते, नितीन इंगळे, ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री यशवंत आव्हाड, ताराचंद लकारे, अनिता वक्ते, गंगुबाई जाधव, वैशाली भोंगळे, यांच्यासह पंचकोशीतील विविध संस्थांचे आजी माजी प्रतिनिधी, नागरिक, महिला बचतगटाच्या भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते. शिवाजी यादवराव वक्ते यांनी आभार मानले. सुत्रसंचलन प्रदिप दिपक गायकवाड यांनी केले. 

Leave a Reply

You cannot copy content of this page