कालवा सल्लागार समिती बैठकीत शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग- केशव भवर
Disappointment of farmers in Canal Advisory Committee meeting- Keshav Bhavar
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed 1 Dec.2021 18.30Pm.
कोपरगाव : कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत शहरासह तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी शहराला पाणी शहरालाही नाही व शेतीलाही मिळाले नाही मग मोठा गाजावाजा करून घेतलेल्या बैठकीचा हा फार्स कशासाठी? शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला असल्याची टीका माजी जिल्हा परिषद गटनेते केशव भवर यांनी सल्लागार समितीच्या बैठकीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना केली.
बुधवारी १ डिसेंबर रोजी दुपारी भाजपा संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत शेतकरी व विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपापली मते मांडली व अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले, अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली नाहीत आमदारांनी काहींना बोलू दिले नाही शेतकऱ्यांची समाधान झाले नाही,मग बैठक घेतली कशाला? केवळ फार्स म्हणून बैठक घेतली का? याचा अर्थ अधिकाऱ्यांचे अपयश झाकण्यासाठी बैठक गुंडाळली काय ? असा सवाल साहेबराव रोहोम यांनी केला.
केशव भवर म्हणाले, शंकरराव कोल्हे यांनी या तालुक्याच्या पाण्यासाठी जे काही केले ते इतर कोणी केले नाही ज्यांच्या काळात समन्यायी कायदा झाला ज्यांनी या तालुक्याचे पाणी घालवले त्यांचे पाण्यासाठी योगदान काय ? असा सवाल केला. मंत्रालयात मंत्री व सचिव यांच्या समोर बैठका होत असल्यामुळे थेट निर्णय होतो प्रश्न सुटतात इथे अध्यक्ष बोलू देत नाहीत तर अधिकारी मुक्याचे सोंग घेतात, मग व्यथा मांडण्याचा कुणाकडे ? इथल्या बैठका म्हणजे केवळ फार्स होतो. अशी टीका त्यांनी केली.
कैलास माळी म्हणाले, तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी २०१४ ते २०१९ या पाच वर्षाच्या काळात नियोजन केल्यामुळे पाणी कमी असताना सुद्धा तीन तीन आवर्तने मिळाली आज सर्वांचे पाणी जाऊन धरणे भरलेली असताना दोन दोन आवर्तने देऊन तोंडाला पाने पुसली जात आहे मागच्या वर्षी उन्हाळ्यात चे शेवटचे आवर्तन उशिरा दिल्यामुळे पाणी फुकट वाया गेले आजही तोच घाट घातला जात आहे धरणात पाणी शिल्लक राहते हे खात्याचे अपयश आहे तेव्हा उन्हाळा वर्तन मार्च एप्रिल मे देऊन संपवा तर त्याचा उपयोग शेतीला होईल असे त्यांनी सांगितले.
आमदार अधिकार्यांना पाठीशी घालतात, शेतकऱ्यांच्या भावना समजून न घेता राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला जातो. ज्यांनी गोंधळ घातला ते शेतकरी होते का?त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेल्या तांत्रिक मुद्दयालाही अधिकारी असो की अध्यक्ष यांना उत्तर देता आले नाही. आम्हाला पाणी द्यायचे नाही पाणी वाचवायचे हे वाचणारे पाणी कोणाला विकणार ?त्याचे हप्ते मंत्रालयात जाणार आहेत का ? संतप्त सवाल रोहोम यांनी केला.
कालवा सल्लागार समिती बैठकीला आम्ही विरोधासाठी गेलो नव्हतो. तर हक्काचे पाणी मिळावे यासाठी आलो होतो. गेल्या दोन वर्षात चाऱ्या दुरुस्तीसाठी फावडे सुद्धा लागले नाही. बॅक वॉटर चे पाणी जाते कुठे? कोपरगाव शहराला पाणी का मागितले नाही ? असा सवाल सुनील देवकर यांनी केला.
कालवा सल्लागार समिती बैठकीला शेतकरी म्हणून गेलो होतो, गट पक्ष म्हणून नव्हतो गेलो, गाजावाजा करून बैठक घेतली परंतु त्याचे फलित मात्र काय?असा सवाल केला.एकरी दोन हजार रुपये पाणीपट्टी आकारली जाते, बोगस पाणीपट्टी रद्द करा, पाणीपट्टीचे दर जाहीर करा, एकीकडे निळवंडेचे नको म्हणायचे आणि दारणाचे येऊ द्यायचे नाही या धोरणामुळेच कोपरगाव चे पाणी गेले अशी खंत प्रदीप नवले यांनी व्यक्त केली.
या पत्रकार परिषदेत साठी केशव भवर, सुनील देवकर, साहेबराव रोहोम , प्रदीप नवले, कैलास माळी , अशोकराव भाकरे , ज्ञानेश्वर परजणे ,फकीराव बोरणारे, कैलास संवत्सरकर, वेणूनाथ बोळीज , विकासराव मोरे, नानासाहेब थोरात, बद्रीनाथ सांगळे, रामदास शिंदे, आदी शेतकरी उपस्थित होते
चौकट
सन २०१९ पासून वेस्टेज वॉटर चे प्रमाण वाढले आहे. आवर्तन झाल्यानंतर पिकअप वेअर मध्ये एक ते दीड टीएमसी पाणी शिल्लक राहते. मात्र ते पाणी नंतर गायब कुठे होते याची चौकशी पाटबंधारे खाते का करीत नाही ?तिकडच्या कालव्याचे आमदार शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकतात. मग इकडचे आमदार गप्प का होते? निळवंडे चा पाया तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी रचला ते स्वच्छ पाणी आणा आणि आता कळस रचा – केशव भवर





