पोहेगाव येथे रविवारी मोफत भव्य सर्वरोगनिदान, व रक्तदान शिबीर- अशोक रोहमारे

पोहेगाव येथे रविवारी मोफत भव्य सर्वरोगनिदान, व रक्तदान शिबीर- अशोक रोहमारे

Free grand diagnosis and blood donation camp at Pohegaon on Sunday – Ashok Rohmare

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu 2 Dec.2021 17.30Pm.

 कोपरगाव: कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार कै. के. बी. रोहमारे यांच्या २३ व्या स्मृतीदिनी रविवारी (५) रोजी पोहेगाव वक्रतुंड मंगल कार्यालयात मोफत भव्य सर्वरोगनिदान, रक्तदान शिबीर व कोव्हिड १९ लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष अशोक रोहमारे यांनी येथे सांगितले.

या शिबीरात नेत्ररोगतज्ञ डॉ. प्राजक्ता एस. मुळे, बालरोगतज्ञ डॉ. प्रियंका एस. मुळे, ह्दयरोग तज्ञ डॉ. संकेत डी. मुळे, स्त्रीरोग तज्ञ डॉ. योगेश एच. लाडे, अस्तीरोग तज्ञ डॉ. संजय उंबरकर तसेच दंतचिकित्सक डॉ. निलेश गायकवाड इ. मान्यवर व विभिन्न विषयातील तज्ञ डॉक्टर्स उपस्थित राहणार आहे. प्रवरा मेडीकल ट्रस्ट, प्रवरानगर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर तसेच प्राथामिक आरोग्य केंद्र, पोहेगाव यांचे सहकार्याने कोव्हिड १९ लसीकरण करण्यात येणार आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page