कोल्हे कारखान्यांच्या कामगारांना १२ टक्के वाढीसह वेतन अदा – विवेक कोल्हे

कोल्हे कारखान्यांच्या कामगारांना १२ टक्के वाढीसह वेतन अदा – विवेक कोल्हे

Wages paid to workers of Kohle factories with 12% increase – Vivek Kolhe

कोपरगांव तालुका साखर कामगार सभेकडुन अभिनंदन Congratulations from Kopargaon Taluka Sugar Workers Meeting

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir 3 Dec.2021 18.00Pm.

 

कोपरगांव :   सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याने ऑक्टोंबरचे वेतन १२ टक्के वाढीसह कामगारांच्या खात्यावर नुकतेच वर्ग करण्यांत आले आहे. त्याबददल कोपरगांव तालुका साखर कामगार सभा सहजानंदनगर शाखेचे मनोहर शिंदे, कामगार संचालक वेणूनाथ बोळीज, गणपतराव दवंगे यांच्यासह युनियनचे सर्व प्रतिनिधींनी कारखान्यांचे तज्ञ संचालक विवेक कोल्हे यांचे विशेष अभिनंदन केले आहे. विवेक कोल्हे यांनी साखर कामगारांचे सर्व प्रश्न जाणून घेऊन त्यावर यशस्वी उपाययोजना केल्या आहेत.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांने अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली अनेक पायलट प्रकल्प राज्यातील साखर कारखानदारीला दिले आहेत. शेतक-यांचे प्रति हेक्टरी उस उत्पादन वाढ करून अन्य माहितीसह मार्गदर्शन त्यांच्या थेट बांधावर देण्यांचा संचालक मंडळासह व्यवस्थापनाचा सतत प्रयत्न असुन उस उत्पादक शेतक-यांच्या प्रत्येक संकटात साथ देवुन त्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने ते कार्यरत असतात.           

उसाच्या रसापासुन थेट इथेनॉल निर्मीती करण्यांचे धाडसी पाउल कोल्हे कारखान्यांने राज्यात सर्वप्रथम उचलले.   याशिवाय तज्ञ संचालक विवेक कोल्हे यांनी आत्मनिर्भर भारत योजनेत देशात सर्वप्रथम पॅरासिटामॉल औषधी उत्पादन प्रकल्प अंमलबजावणी कोल्हे कारखान्यात सुरू केली आहे, अन्य रासायनिक उप पदार्थ  निर्मितीचे प्रकल्प सुरू केले. राज्यातील साखर कामगारांना १२ टक्के वेतनवाढीचा निर्णय जाहिर झाल्याबरोबर त्याची सर्व प्रथम घोषणा तज्ञ संचालक विवेक कोल्हे यांनी कामगारांशी हितगुज साधुन जाहिर केली होती आणि त्यांनी दिलेल्या शब्दाची तंतोतंत अंमलबजावणी  ऑक्टोंबरच्या वेतनापासून करून सर्वप्रथम सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांतील कामगारांच्या बँक खात्यावर त्याची रक्कम वर्ग करण्यांत आली आहे, त्यामुळे कामगारांनी व्यवस्थापनासह तालुका साखर कामगार सभेचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page