छ. शिवाजी महाराज यांच्या नावाची कमान उभारण्यास परवानगी मिळावी-शिवसेना
Is. Permission should be granted to erect an arch in the name of Shivaji Maharaj -ShivSena
नगर पालिकेने तातडीने ठराव घेण्याची मागणीDemand for immediate resolution by the municipality
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir 3 Dec.2021 18.20Pm.
कोपरगाव : शहरात ज्यांना महापुरुषांच्या नावाने कमान करावयाची आहे. त्यांनी स्वखर्चाने करावी. त्यास नगरपालिका मंजुरी देण्यास तयार आहे. असा निर्णय नगरपालिकेने घेतला असून हा निर्णय चांगला आणि स्वागतार्ह आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाची कमान उभारण्यास परवानगी मिळावी, अशी रास्त मागणी करत कोपरगाव शहर शिवसेनेने याबाबतचा ठराव पालिकेने करावा, त्याला सर्व नगरसेवक बिनशर्त पाठिंबा देईल, असेही म्हटले आहे.
यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात कोपरगाव शहर शिवसेना यांनी म्हटले आहे की, १२ ऑक्टोबर च्या मीटिंग मध्ये ज्यांना कमान बांधकाम करावयाचे असेल त्यांनी स्वखर्चाने करावे, आम्ही परवानगी देण्यास तयार आहोत, असे आवाहन पालिकेने केले होते.पालिकेने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतानाच या आवाहनाला प्रतिसाद देऊन शहराचे सुशोभिकरण करण्यासाठी व वैभवात भर घालण्यासाठी मेन रोडवर शेखर कोलते यांच्या गोदावरी मिल्क पार्लर ते तुषार देवडे यांच्या साधना पान स्टॉल अशी पूर्व-पश्चिम रिक्षा स्टँड लगत छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार अशी भव्य कमान बांधण्यासाठी परवानगी देण्यात यावी, सदर कमानीचा खर्च आम्ही व्यक्तिगत रित्या करणार आहोत. याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. यासाठी पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ठराव करावा. सर्व नगरसेवक या ठरावाला बिनशर्त पाठिंबा देतील, व शहराच्या वैभवात भर घालण्याची संधी आम्हाला देतील असेही शिवसेनेने पत्रकात नमूद केले आहे.
सदर निवेदन कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्याकडे १० नोव्हेंबर सदर विषयाबाबत अर्ज करण्यात आला होता. मात्र सर्वसाधारण सभा झाली नसल्यामुळे त्यानंतर नगराध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना १ डिसेंबर रोजी स्मरण पत्र देण्यात आले आहे. अशी माहिती शिवसेनेच्या वतीने देण्यात आली आहे.





