कर्मचाऱ्यांनी स्वतः प्रमाणे संस्थेची सुरक्षितता राखावी- वासुदेव देसले

कर्मचाऱ्यांनी स्वतः प्रमाणे संस्थेची सुरक्षितता राखावी- वासुदेव देसले

Employees should keep the security of the organization as their own – Vasudev Desale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat 4 Dec.2021 16.20Pm.

कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्थेची स्थिती सरकारी बँकेला लाजवेल अशी असून महाराष्ट्रात होत असलेल्या दरोड्याच्या घटनांमुळे बँका, पतसंस्थांनी विविध उपाय योजना तयार करणे महत्त्वाचे आहे. पतसंस्थांच्या प्रत्येक अधिकाऱ्यापासून ते शिपायांपर्यंत प्रसंगावधान, समयसूचकता साधून स्वतःच्या सुरक्षितते बरोबरच संस्थेची देखील सुरक्षा करता आली पाहिजे असे प्रतिपादन कोपरगाव शहर पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी समता पतसंस्थेच्या”पतसंस्था दरोडा प्रतिबंध सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाय योजना’ या विषयावर बोलताना केले.

२४० हून अधिक कर्मचाऱ्यांना झूम मिटिंग च्या माध्यमातून ऑनलाईन मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी संस्था पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष काका कोयटे होते. पो.नि.वासुदेव देसले यांचा सत्कार अगरबत्ती व कापूराचा गुच्छ देवून करण्यात आला.

वासुदेव देसले म्हणाले की, अनेक ठिकाणी शाल व पुष्पगुच्छ यांचे सत्कार स्वीकारले परंतु समताच्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या अगरबत्ती व कापूराचा गुच्छ देऊन केलेला सत्कार हा भावनिक दृष्ट्या नाळ घट्ट करणारा असल्याचे असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या .

अरविंद पटेल म्हणाले की, महाराष्ट्रातील सध्याची स्थिती पाहता पतसंस्थांना दरोडा प्रतिबंध सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक पतसंस्थेने विविध उपाय योजना करून त्या राबविणे काळाची गरज बनली आहे या उद्देशाने या ऑनलाईन मिटींगचे आयोजन करण्यात आले होते. कर्मचा-यांनी स्वतःच्या घराप्रमाणे आपल्या पतसंस्थेच्या सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे. प्रसंगी संचालक चांगदेव शिरोडे, संदीप कोयटे, गुलशन होडे, जनरल मॅनेजर सचिन भट्टड, मुख्य कार्यालयाचे अधिकारी, शाखाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन ई.डी.पी. विभागप्रमुख योगेश आसने यांनी केले तर आभार संचालक अरविंद पटेल यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page