कमी पाण्यात, कमी खर्चात, जादा उस उत्पादनावरआपला भर राहणार – विवेक कोल्हे
We will focus on less water, less cost, more sugarcane – Vivek Kolhe
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat 4 Dec.2021 17.20Pm.
कोपरगाव:उस संशोधन विकासात आधिकाधिक प्रगती करून क्षारयुक्त, चोपण व नदीकाठच्या जमिनीमध्ये कमी पाण्यात कमी खर्चात उसाचे उत्पादन अधिक कसे वाढेल यावर आपला भर राहणार असल्याचे प्रतिपादन विवेक कोल्हे यांनी देशपातळीवरील कोईमतूर ऊस संशोधन संस्थेचे उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल अमृत व सुवर्ण संजीवनी शुगर केन यांनी शनिवारी केलेल्या सत्कार प्रसंगी केले.
अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान व सुवर्ण संजीवनीचे उपाध्यक्षशिवनाथ शिंदे, उपाध्यक्ष राहुल चांदगुडे व सर्व संचालकांनी त्यांचा सत्कार केला .
प्रारंभी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे व अमृत सुवर्ण शुगरकेन संस्थेचे मानद कार्यकारी संचालक बापूसाहेब औताडे यांनी स्वागत केले. याप्रसंगी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, केन मॅनेजर गोरखनाथ शिंदे, अमृत व सुवर्ण संजीवनी शुगरकेन संस्थेचे संचालक लक्ष्मीकांत होन, भाउसाहेब होन, गोपीनाथ गायकवाड, विजय जामदार कचेश्वर रानोडे, बिच्चुनाना जाधव, अंबादास देवकर, रविंद्र आगवण, सोपानराव कासार, देविदास भिंगारे, विकास शिंदे, सलीम शेख, अशोकराव आवारे, विजय काळे, सिताराम वाळके, रमेश उगले, जालिंदर आढाव, संतोष भिंगारे, लहानु मेमाणे, चंद्रकांत चांदगुडे, संदिप देवकर, विलास भाकरे, मनोज चव्हाण, बाळासाहेब आहेर, सुभाष आहेर, बळवंत नरोडे, राधाकिसन कदम, बबनराव आहेर, योगेश मांजरे, संतोष कदम, अकौंटंट एस सी निकम आदि उपस्थित होते.
विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचे मार्गदर्शन आणि संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना कार्यक्षेत्रातील उस उत्पादक सभासदांचे दर एकरी उत्पादन वाढावे म्हणून सातत्याने प्रयत्न सुरू आहे, उसाचा उतारा वाढला की त्याचा फायदा शेतक-यांना मिळतो म्हणून बिपीन कोल्हे यांनी कार्यक्षेत्रात ८६०३२ उस वाणाबरोबरच अन्य नवनविन जातीच्या लागवडीसाठी कालबध्द कार्यक्रम घेवुन त्याबाबतचे संपुर्ण मार्गदर्शन दिले, कोईमतुर उस संस्थेअंतर्गत कार्यरत संचालक शास्त्रज्ञांचे सहकार्याने अधिक चांगले काम करून शेतक-यांच्या उस उत्पादन वाढीसाठी काय उपाययोजना करता येतील याचा प्रामाणिक प्रयत्न करू. अशी ग्वाही दिली शेवटी मानद कार्यकारी संचालक बापूसाहेब औताडे यांनी आभार मानले.





