स्व. आ. के. बी. रोहमारे यांचे कोपरगावच्या जडणघडणीत मोठे काम होते – आ. आशुतोष काळे

स्व. आ. के. बी. रोहमारे यांचे कोपरगावच्या जडणघडणीत मोठे काम होते – आ. आशुतोष काळे

Late. Come on. K. B. Rohmare had a big job in the construction of Kopargaon. Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun 5 Dec.2021 18.50Pm.

कोपरगाव: साधी राहणी गांधीविचार काँग्रेसचे एकनिष्ठ नेतृत्व काळे व कोल्हे दोन्ही साखर कारखान्यासह कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी उभारणीत त्यांनी महत्त्वाचे काम केले. अशा स्व. आ. के. बी. रोहमारे यांचे कोपरगावच्या जडणघडणीत मोठे काम होते असे गौरवोद्गार आ. आशुतोष काळे यांनी पोहेगाव येथील सर्व रोगनिदान शिबिर कार्यक्रमात व्यक्त केले. कोपरगाव तालुका व जिल्ह्याच्या राजकारणात कर्मवीर शंकरराव काळे यांच्या समवेत त्यांनी एकत्र काम केले. त्यांच्यानंतर आजही तिसऱ्या पिढीत रोहमारे व काळे चांगले संबंध जोपासत आहे.असेही ते म्हणाले,

यावेळी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे, रमेशराव रोहमारे, डॉ. दत्तात्रेय मुळे ,साईनाथ रोहमारे, एम. टी. रोहमारे, प्राचार्य बी एस यादव, संजय रोहमारे ,राजुकाका रोहमारे, बाबासाहेब रोहमारे, दीपक रोहमारे, सुनील बोरा, सौ. शोभाताई रोहमारे ,सौ मंदाताई रोहमारे,सौ. वैशाली आभाळे, ॲड राहुल रोहमारे, संदीप रोहमारे, विक्रांत रोहमारे,अमित रोहमारे, देवेंद्र रोहमारे, विनोद रोहमारे, शंकरराव चव्हाण, राम थोरे, अभिजीत नाईकवाडे,डॉ संजय उंबरकर ,डॉ. नीलेश गायकवाड, डॉ संकेत मुळे, डॉ. प्राजक्ता मुळे, डॉ. प्रियंका मुळे, डॉ. योगेश लाडे, डॉ. दीपाली आचारी ,डॉ नितीन गवळी, डॉ. मनिष कोठारी, डॉ. पठाण ,डॉ. प्रसाद चौधरी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात ॲड. राहुल रोहमारे यांनी उपक्रमांची माहिती दिली. अशोकराव रोहमारे यांनी स्व. के. बी. रोहमारे यांच्या स्मृतिदिनी रोहमारे परिवाराने ग्रामीण साहित्य पुरस्कार देण्याची परंपरा कायम ठेवली आहे असे सांगितले. डॉ दत्तात्रय मुळे यांनीही मार्गदर्शन केले. प्रवरा मेडिकल ट्रस्ट च्या वतीने शिबिरात रक्तदात्याचे रक्त संकलित करण्यात आले. शिबिरामध्ये पोहेगाव व परिसरातील अनेक रुग्णांनी लाभ घेतला. सूत्रसंचालन डॉ. शैलेंद्र बनसोडे यांनी केले तर आभार राम थोरे यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page