कोईमतुर ऊस संशोधन संस्थेमार्फत शेतकऱ्यांना बळ देणार-विवेक कोल्हे

कोईमतुर ऊस संशोधन संस्थेमार्फत शेतकऱ्यांना बळ देणार-विवेक कोल्हे

Vivek Kolhe to empower farmers through Coimbatore Sugarcane Research Institute

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun 5 Dec.2021 19.00Pm.

कोपरगाव: प्रति हेक्टरी उसाचे उत्पादन वाढावे यासाठी कोईमतुर उस संशोधन संस्थेमार्फत शेतकऱ्यांना बळ देणार असल्याची ग्वाही कोईमतूर ऊस संशोधन संस्थेचे उपाध्यक्ष विवेक कोल्हे यांनी मुर्शतपुर येथील सत्कार कार्यक्रमात दिली.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी स्वागव व प्रास्तविक केले. याप्रसंगी अन्वरभाई शेख, साहेबराव शिंदे, गोरख दवंगे, सिताराम तिपायले, बद्रीनाथ देवकर, त्र्यंबकराव दवंगे, मधुकर उगले, प्रकाश दवंगे, असलम शेख, जगन्नाथ दवंगे, चंद्रकांत दवंगे, बापुराव दवंगे, संदिपराव उगले माजी प्रतोद केशव भवर आदि उपस्थीत होते.

विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, शेतीत संशोधनाला विशेष महत्व आहे. विभागातील जमीन प्रतवारीत फुलणाऱ्या उस जातीचे संशोधन कोईमतूर संस्थेने केले आहे., तर भविष्यात ऊस लागवडीत येणाऱ्या अडीअडचणी वर संशोधनही सुरू आहे,. बारमाही पीक उत्पादनांत उस शेती फायद्यiची आहे, त्यासाठी शेतकऱ्यांनी बदलत्या अत्याधुनिक शैलीचा वापर करून उत्पादन घ्यावे, शेण खताबरोबर शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या उपाय योजनानुरूप ऊस लागवड करावी, यात येणाऱ्या अडचणी बाबत कोल्हे कारखान्यांच्या उस विकास विभागाशी संपर्क करावा. असे आवाहनही त्यांनी केले.

शेवटी अन्वरभाई शेख यांनी आभार मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page