मोदी सरकार पळवून लावा -प्रा. तुषार वाघमारे

मोदी सरकार पळवून लावा -प्रा. तुषार वाघमारे

Get rid of Modi government – Pro. Tushar Waghmare

राष्ट्रवादी कांग्रेस परिवार संवाद व कार्यकर्ता शिबिरNationalist Congress Family Dialogue and Activist Camp

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon 6 Dec.2021 20.30Pm.

कोपरगाव : मोदी सरकार ने सात वर्षात दरवर्षी दोन कोटी प्रमाणे सात वर्षात १४ कोटी लोकांना रोजगार दिला तर नाहीच उलट सात कोटी लोकांना बेरोजगार केले. मोफत गॅस च्या नावाखाली महिलांची फसवणूक केली पेट्रोल डिझेलदरवाढ करून वीस लाख कोटीचा खिसा कापला,नोटाबंदी आणि जीएसटीमुळे छोट्या-छोट्या वीस हजार शेतकरी व उद्योजकांना आत्महत्या कराव्या लागल्या हे टाळायचे असेल तर मोदी सरकारला पळवून लावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता प्रशिक्षण विभाग प्रदेश उपाध्यक्ष प्रा. तुषार वाघमारे सर यांनी कोपरगाव येथे सोमवारी (दि.६) रोजी कोपरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रवादी कांग्रेस परिवार संवाद व कार्यकर्ता शिबिरात केले.

प्रा. तुषार वाघमारे म्हणाले, आमदार आशुतोष काळे सारखे नेतृत्व भाग्याने मिळते ते नेतृत्व सांभाळण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. नगर जिल्हा हा राष्ट्रवादीच्या तरुण आमदारांचा जिल्हा आहे. काल विखे होते, आज थोरात आहे, उद्या काळे राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तरुणांना कर्तृत्व दाखविण्याची आणि नेतृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल, त्यांनी त्या संधीचा लाभ घ्यावा, बूथ कमिटी मांडणी करा निवडणुकीत यश मिळविण्यासाठी मोलाचा वाटा द्या असे आवाहन यावेळी केले.

यावेळी माहिती व तंत्र विभाग अध्यक्ष जितेंद्र सरडे म्हणाले, आमदार आशुतोष काळे यांचे कार्य गल्लीगल्लीत घराघरात पोहचवा प्रभावीपणे काम कराल, याची खात्री बाळगतो. देशाचे नेतृत्व शरद पवारच करू शकतात. मोदी सरकारच्या संकटातून वाचावयाचे असेल तर शरद पवार हेच पंतप्रधान व्हावेत यासाठी मतदानाची ताकद वाढवा संघटन वाढवा पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका प्रत्येक निवडणुकीला ताकदीने सामोरे जा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका या येणाऱ्या सर्व निवडणुकींना मोठ्या ताकदीने सामोरे जाऊ असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी कार्यकर्ता शिबिरात कार्यकर्त्यांना केले.

राष्ट्रवादी काँग्रेस मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार आशुतोष काळे

यावेळी बोलताना आ. आशुतोष काळे म्हणाले गेल्या पन्नास-पंचावन्न वर्षाच्या शरद पवार यांच्या कारकीर्दीचा कार्यकाल अगदी कमी वेळात मांडणे हे आजच्या शिबिराचे प्रमुख वक्ते प्रा. तुषार वाघमारे व जितेश सरडे यांच्यापुढे मोठे आव्हान होते. परंतु त्यांनी ते अतिशय प्रभावीपणे आपल्या समोर मांडले आहे. असे ते म्हणाले, आ. आशुतोष काळे पुढे म्हणाले, मला आपल्या सर्वांकडून ह्याच अपेक्षा आहेत की, शरद पवार यांनी केलेले कार्य गावागावात वार्ड वार्डात, गल्लीगल्लीत सर्वांपर्यंत पोहोचविणे हे काम करायचे आहे,. ते आपण प्रभावीपणे करालं, याची खात्री बाळगतो. मागच्या वेळी याच ठिकाणी मी म्हणालो होतो, या काळात देशाचे नेतृत्व जर कोणी करू शकत असेल तर ते केवळ फक्त शरद पवार हेच करू शकतात. आज पुन्हा या शिबिराच्या निमित्ताने आलेल्या पाहुण्यांच्या भाषेतून याच गोष्टीचा पुनरुच्चार झाल्याचे त्यांनी सांगितले. देशावर मोदीचे संकट आले आहे. यापासून देश वाचविण्यासाठी शरद पवार हेच पंतप्रधान व्हावे लागेल. म्हणून आपल्या सर्वांचे हेच मोठे काम आहे. आपण आपल्या भागातून शरद पवार यांचे मागे ताकद उभी करण्यासाठी आपले मतदान व आपले संघटन वाढविण्याची गरज आहे. असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी केले,तर तालुका अध्यक्ष माधवराव खिलारी आपल्या मनोगतात तालुक्याच्या प्रश्नांचा ऊहापोह केला सूत्रसंचालन रमेश गवळी यांनी केले. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे, कारभारी पाटील आगवण, सुधाकर रोहोम, धरमशेठ बागरेचा नवाज कुरेशी, प्रतिभा शिलेदार, मंगल वाकचौरे, आदी सर राष्ट्रवादी काँग्रेस महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

You cannot copy content of this page