रोहमारे परिवाराची ग्रामीण साहित्याबद्दलच्या आस्थेमुळे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आलो- डॉ. सदानंद देशमुख
I came to express my gratitude to the Rohmare family for their passion for rural literature. Dr.Sadananda Deshmukh
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue 7 Dec.2021 19.00Pm.
कोपरगाव : “ कोणताही साहित्य पुरस्कार हा लेखकाला ऊर्जा व लेखनाची प्रेरणा देणारा असतो. १९९० साली माझ्या अंधारबन कथासंग्रहाला पहिला भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार प्राप्त झाला होता. आज ३१ वर्षांनी पुन्हा कोपरगावात आलो ते केवळ रोहमारे परिवाराचे शेती. शेतकरी व शेतमजूर आणि ग्रामीण साहित्याबद्दल असलेली आस्था आणि तळमळ बघून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच असे गौरव उद्गार लेखक डॉ. सदानंद देशमुख यांनी माजी आमदार के. बी. रोहमारे यांच्या २४ व्या पुण्यस्मरण दिनी भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार वितरण प्रसंगी केले. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे होते.
डॉ. देशमुख पुढे म्हणाले की, “महाराष्ट्राचे खरे विद्यापीठ नेवाशाला आहे. कारण तेथेच युगकर्त संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी या कालजयी ग्रंथाची निर्मिती केली. नवनिर्मितीची आस व कृषि संस्कृतीतून प्रेरणा घेऊनच संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी या अजरामर ग्रंथाची रचना केली. यातून कृषि व कष्टकरी संस्कृतीच्या आड येणाऱ्या खलप्रवृत्तीचा नाश करण्याचा संदेश दिला गेला. असल्याचे सांगितले यावेळी त्यांनी ‘बारोमास’ हो कविता सादर करून श्रोत्यांची दाद मिळवली.
पद्मकांत कुदळे म्हणाले की, के. बी. दादांना व्यक्तीगत आयुष्यात खूप मोठे होता आले असते, कारण त्यांच्या भोवती यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, बाळासाहेब भारदे, शंकरराव चव्हाण यासारखी हिमालयाएवढी उंचीची माणसे होती. नगर जिल्हा आणि कोपरगाव तालुक्यातील अनेक शेती केंद्रीत संस्थांच्या उभारणीत व विकासात के. बी. साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. तरी देखील त्यांनी त्याचे कधीही भांडवल केले नाही. ते शेवटपर्यंत केवळ शेतकरी, शेतमजूर य कष्टकरी वर्गाशी नाळ जोडलेली असल्याने ते त्यांच्या उन्नतीसाठीच जगले. ग्रामीण विद्यार्थ्यांनाच प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच या महाविद्यालयाचा नावलौकिक वाढला आहे.
अशोक रोहमारे यांनी आपल्या तीर्थरूपांच्या आठवणी जागवत भि. ग. रोहमारे साहित्य पुरस्काराचा इतिहास विशद केला.
संस्थेचे सचिव र ॲड. संजीव कुलकर्णी यांनी भि. ग. रोहमारे पुरस्कार योजनेसाठी गेली ३२ वर्षे योगदान करणाऱ्या रोहमारे परिवाराचे कौतुक केले.
कादंबरीकार संतोष जगताप, माधव जाधव, जयराम खेडेकर, केदार काळवणे, अनंता सूर डॉ. सदानंद देशमुख यांच्या हस्ते भि. ग. रोहमारे पुरस्कारांचे वितरण आले. सर्व पुरस्कार विजेत्यांनी सत्काराला उत्तर देतांना आपापल्या लेखनामागील प्रेरणा व भूमिका कथन करतांना नमुना दाखल मार्मिक कविता सादर केल्या.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी केले. तर परिचय प्रा. डॉ. जिभाऊ मोरे यांनी तर सूत्रसंचालन डॉ. शैलेंद्र बनसोडे यांनी केले. शेवटी आभार ॲड. राहुल रोहमारे यांनी आभार मानले.
यावेळी रमेशराव रोहमारे, चंद्रशेखर कुलकर्णी, मा. जवाहर शहा, अॅड. संजय भोकरे, सुनिल शिंदे, संदिप रोहमारे, सुनिल बोरा, परीक्षक डॉ. भिमराव वाकचौरे, रोहमारे कुटुंबीय, प्रतिष्ठीत नागरिक, साहित्य रसिक, सेवकवृंद व विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.