१३० कोटी भारतवासीयांचे हिरो बिपिन रावत अमर रहे.

१३० कोटी भारतवासीयांचे हिरो बिपिन रावत अमर रहे.

Bipin Rawat, the hero of 130 crore Indians, remains immortal.

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu 9 Dec.2021 17.20Pm.

कोपरगाव : भारताच्या तिन्ही संरक्षण विभागाचे प्रमुख बिपिन रावत व त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि ११ लष्करी अधिकारी यांचा तामिळनाडू येथे हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला, ही बाब अत्यंत संवेदनापूर्ण असून भारत देशाच्या संरक्षणामध्ये सर्वोच्च कामगिरी बजावून दहशतवाद्यांचा कर्दनकाळ ठरलेले १३० कोटी भारतवासीयांचे हिरो बिपिन रावत आपल्यातून निघून गेले, त्यांची वक्तव्य हीच आपली खरी ताकद होती अशा शब्दात संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी शोक व्यक्त केला,

रावत यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची परमेश्वर ताकद देवो अशा शब्दात भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी श्रद्धांजली वाहिली. 

Leave a Reply

You cannot copy content of this page