दिलेला शब्द पूर्ण केला,  – आ.आशुतोष काळे

दिलेला शब्द पूर्ण केला, – आ.आशुतोष काळे

Fulfilled the given promise,  – MLA Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu 9 Dec.2021 17.30Pm.

कोपरगाव :आमदार झाल्यानंतर बार असोसिएशननच्या वतीने सत्कार करून न्यायालयाच्या इमारतीच्या अडचणी मांडल्या होत्या. त्यावेळी न्यायालयाच्या इमारतीसाठी निधी देण्याचा शब्द दिला होता. दिलेला शब्द पूर्ण करून न्यायालयाच्या इमारतीसाठी निधी देवून तुमच्या विश्वासाला पात्र ठरलो आहे. मी दिलेला शब्द पूर्ण केला आहे. कोपरगाव शहरातील विकासाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी नगरपालिकेची सत्ता देऊन तुम्ही तुमची जबाबदारी पूर्ण करा असे आवाहन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी केले.

कोपरगाव दिवाणी न्यायालय (‘क’ स्तर, व स्तर) नवीन इमारत बांधकामासाठी ३८ कोटी ६३ लक्ष रुपये निधी मंजूर करून आणल्याबद्दल व श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कोपरगाव बार असोसिएशनच्या वतीने आ.आशुतोष काळे यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते.             

पुढे बोलतांना ते म्हणाले की,विधानसभा निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करून पाच नंबर साठवण तलावाला १२० कोटींची तांत्रिक मंजुरी मिळवून दिली व पुढील मंजुरी लवकरात लवकर मिळविण्याची जबाबदारी माझी आहे.कोर्टाच्या बाबतीतल्या देखील अडचणी सोडविल्या आहे. शहर विकासासाच्या बाबतीत अजूनही अडचणी आहेत त्यासाठी आपण वारंवार प्रश्न मांडले होते. मात्र यापुढे फक्त प्रश्न मांडून थांबता येणार नाही ते सोडविण्यासाठी नगरपालिकेची सत्ता अत्यंत महत्वाची आहे. शहराविकासाठी महाविकास आघाडी सरकारकडून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी मी समर्थ आहे परंतु आणलेला निधी खर्च करण्यासाठी राष्ट्रवादीच्या ताब्यात सत्ता असणे आवश्यक आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या ताब्यात नगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून विकासकामे करून घेण्याची मी जबाबदारी घेतो तुम्ही तुमची जबाबदारी पूर्ण करा असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले.

यावेळी ॲड . आर.एस. जपे,ॲड. एस.एस. धोर्डे, ॲड. पी.सी. कडू, यांनी आपले मनोगत व्यक्त करून न्यायालयाच्या इमारतीसाठी निधी दिल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले.               

  यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, नगरसेवक, गटनेते विरेन बोरावके, हाजी मेहमूद सय्यद रमेशजी गवळी फकीर कुरेशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.आर. पाटील, उपअभियंता प्रशांत वाकचौरे, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विद्यासागर शिंदे, ॲड. गणेश भोकरे, ॲड. प्रशांत वाकचौरे,ॲड. आर.एस. जपे, ॲड  एस.एस. धोर्डे, ॲड. पी.सी. कडू,ॲड . एस.जे. देशमुख,ॲड . एस.बी. लोहकणे,ॲड . जी.बी. मोकळ,ॲड . सौ. मंजिरी देशमुख, ॲड.एस.बी. रक्ताटे,ॲड . योगेश खालकर, ॲड. जी.बी. भवर,ॲड . नितीन खैरनार, ॲड.नितीन पोळ,ॲड . एस.एस. भोकरे,ॲड .एम. एल. मोरे,ॲड . एस. जी. गुरव, ॲड.जी.जी. गुरसळ,ॲड . व्ही.जी. गवांदे, बार सहाय्यक देवकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.  विद्यासागर शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार ॲड .गणेश भोकरे यांनी मानले. 

Leave a Reply

You cannot copy content of this page