कोकमठाणच्या गो-शाळेला १० लाखाचा निधी  आ.आशुतोष काळे यांनी दिला  

कोकमठाणच्या गो-शाळेला १० लाखाचा निधी  आ.आशुतोष काळे यांनी दिला

MLA Ashutosh Kale donated Rs. 10 lakhs to Kokmathan Go-Shala

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lMon 13 Dec.2021 17.40Pm.

कोपरगाव : तालुक्यातील कोकमठाण येथील गो-शाळेत विविध विकासकामे करण्यासाठी श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत देण्यात येणाऱ्या १० लाख रुपये निधीचे पत्र नुकतेच आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते गोशाळा चालक व कोकमठाण ग्रामस्थांना सुपूर्द करण्यात आले आहे.

कोपरगाव तालुक्यात कोकमठाण येथे गोकुळधाम हि मोठी गो-शाळा आहे. या गो-शाळेत जवळपास २०० लहान-मोठ्या गायी आहेत. गो-शाळेत गायींची योग्य प्रकारे काळजी घेतली जात असून अधिक सोयी-सुविधा निर्माण व्हाव्या व ही गो-शाळा आदर्श गो-शाळा व्हावी यासाठी करण्यात येणाऱ्या विकासकामांना आ.आशुतोष काळे यांनी १० लाख रुपये निधी दिला आहे.

यावेळी कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, धरमचंद बागरेचा, सुनील गंगूले,  मंदार पहाडे, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, डॉ. अमोल अजमेरे,  सुनील शिलेदार, रमेश गवळी, अमित जैन, आनंद पहाडे, आनंद दगडे, अमोल काले, प्रविण पाटणी, शैलेश ठोळे,  परेश ठोळे, पियुष गंगवाल,सचिन पहाडे, अक्षय लोहाडे, आदी समाज बांधव उपस्थित होते. 

Leave a Reply

You cannot copy content of this page