जनार्दन स्वामी ३२ व्या पुण्यतिथी जपानुष्ठान सोहळा सुरू

जनार्दन स्वामी ३२ व्या पुण्यतिथी जपानुष्ठान सोहळा सुरू

Janardan Swamy 32nd Punyatithi Jap ceremony begins

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lMon 13 Dec.2021 17.30Pm.

कोपरगाव: येथील बेट भागातील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज समाधी मंदिरावर ३२ व्या पुण्यतिथी दिनानिमित्त भव्य जपानुष्ठान सोहळा सुरू आहे. जवळपास तीनशे भाविक जपानुष्ठान बसले आहेत. त्यानिमित्ताने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. समाधिस्थान परिसर फुलांनी रांगोळ्यांनी सजवण्यात आला आहे.

आलेल्या सर्व भाविक भक्तांना दररोज फराळाची पंगत दिली जाते खिचडी आमटी भगर मसाला दूध चहा याचे वाटप करण्यात येते अशी माहिती अध्यक्ष दत्तात्रेय होळकर यांनी दिली .                                     

कोपरगांव बेट भागातील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांचा बत्तीसावा  पुण्यतिथी सोहळा समाधीस्थानी ९ ते १६ डिसेंबर दरम्यान सुरू असून भाविकांचा याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री काशिविश्वनाथ महादेव शैक्षणिक व गोपालन ट्रस्टचे नवनिर्वाचित अध्यक्ष दत्तात्रय बाळकृष्ण होळकर व मठाधिपती विश्वस्थ प पू. रमेशगिरी महाराज यांनी केले आहे.                                         

 या कार्यक्रमासाठी वाराणशी येथील जुना पंचदशनाम आखाडयाचे अखिल भारतीय आखाडा परिषदचे आंतरराष्ट्रीय संरक्षक महामंत्री महंत स्वामी हरिगिरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page