रस्त्यांच्या गुणवत्तेत तडजोड केली जाणार नाही – आ. आशुतोष काळे

रस्त्यांच्या गुणवत्तेत तडजोड केली जाणार नाही – आ. आशुतोष काळे

The quality of roads will not be compromised. Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue14 Dec.2021 17.50Pm.

कोपरगाव: मतदार संघातील रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेमुळे नागरिकांनी आजवर मोठा त्रास सहन केला आहे. एकाच रस्त्यासाठी वारंवार निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे होणारे सर्वच रस्ते गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक असून रस्त्याच्या गुणवत्तेत तडजोड केली जाणार नाही असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी माहेगाव देशमुख येथे दोन कोटी रस्ते कामांच्या कार्यक्रमात केले आहे. अध्यक्षस्थानी सभापती सौ. पौर्णिमा जगधने होत्या.

यावेळी उपसभापती अर्जुन काळे, सूर्यभान कोळपे, अरुण चंद्रे, अरुण पानगव्हाणे, संभाजीराव काळे, रविंद्र काळे, सुंदरराव काळे, प्रल्हाद काळे, के.पी. रोकडे उपस्थित होते. आ. आशुतोष काळे म्हणाले की, पश्चिमेच्या नागरिकांना कोपरगावला जाण्यासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या सुरेगाव-धरणगाव या रस्त्याची दुरावस्था झाली होती. या आजवर प्रतिकूल परिस्थितीत ९० कोटी पेक्षा जास्त निधी आणला आहे. मतदार संघाच्या विकासासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. राजश्री घुले यांचे मोठे सहकार्य मिळाले आहे. येणाऱ्या सर्वच निवडणुकात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार निवडून द्यावे असे आवाहन केले. पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page