५ नं. साठवण तलाव, वितरीकांबाबत विरोधक संभ्रम पसरवित आहे – पद्माकांत कुदळे
No. 5 Opposition is spreading confusion about storage ponds and distributors – Padmakant Kudale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue14 Dec.2021 18.30Pm.
कोपरगाव : श्री. साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी काही दिवसांपूर्वी ५ नं. साठवण तलाव व वितरीकांसाठी १२० कोटीची तांत्रिक मंजुरी मिळविली आहे. मात्र विरोधकांनी नागरिकांमध्ये संभ्रम करणे म्हणजे अप्रत्यक्षपणे ५नं. साठवण तलावालाच विरोध असल्याचे माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
कुदळे पुढे म्हणाले की, कोणत्याही शहराला कोणत्याही धरणातून येणारे पाणी जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून शुद्धीकरण करूनच वितरिकांद्वारे नागरिकांना पुरवठा केला जातो. त्यामुळे आ. आशुतोष काळे यांनी वितरीकांसाठी १२० कोटी रुपयांची तांत्रिक मंजुरी देखील मिळविली आहे. ३.३६ एमएलडी वाढीव पाणी आरक्षित करून घेतले आहे. काही दिवसातच ५ नं. साठवण तलावाचे काम सुरु झाल्याचे नागरिकांना दिसणार आहे. त्यामुळे विरोधक तलाव व वितरीकांबाबत नागरिकांमध्ये संभ्रम पसरविण्याचे काम करीत आहे . त्यामुळे तुम्ही कितीही संभ्रम निर्माण करा जनता सुज्ञ आहे असे त्यांनी म्हटले आहे.
चौकट :- पाण्यावर चालणारे राजकारण ५ नं. साठवण तलाव होणार असल्यामुळे संपुष्टात येईल त्यामुळे काहींची पोटदुखी वाढली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये गैरसमज व संभ्रम निर्माण करण्यासाठी चौका-चौकात प्रसिद्धी केली जात आहे. – पद्माकांत कुदळे





