कोपरगाव पोलिसांनी साडेपाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने तीन वर्षांनी परत मिळवले

कोपरगाव पोलिसांनी साडेपाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने तीन वर्षांनी परत मिळवले

Kopargaon police recovered gold jewelery worth Rs 5.5 lakh after three years

भाडेकरू म्हणून येऊन डल्ला मारणाऱ्या मुंबईच्या दांपत्यास अटक Mumbai couple arrested for beating up tenants

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon20 Dec.2021 18.40Pm.

कोपरगांव : भाडेकरू म्हणून राहण्यास येऊन घरमालकाचा विश्वास संपादन करून साडेपाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या भाडेकरू दाम्पतीस कोपरगाव शहर पोलिसांनी तीन वर्षांनी अटक करून त्यांच्याकडून बारा तोळ्याचे दागिने हस्तगत केले आहे. या कारवाईने कोपरगाव शहर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दागिने चोरणाऱ्या भाडेकरु म्हणून रहावयांस आले, मालकाचा विश्‍वास संपादन केला व घरमालकाचेच साडेपाच लाखाचे १२ तोळे सोन्याचे दागिने लंपास करणार्‍या मुंबई येथील नाईक दाम्पत्यास पोलीसांनी हस्तगत करुन सदरचे दागिने कडलग कुटूंबियाना परत दिल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या संबंधी माहिती नवनीत मधुकर नाईक व त्यांची पत्नी स्मिता नवनीत नाईक हे गांधीनगर भागातील शारदा नारायण कडलग यांच्याकडे भाडेकरु म्हणून आले. व कांही दिवसात त्यांनी घरमालकाचा विश्‍वास संपादन करुन घरात प्रवेश मिळवला. कडलग यांच्या मुलीचे लग्न होते म्हणून त्यांनी लग्नासाठी १२ तोळे सोन्याचे दागिने करुन घरात ठेवले होते. या दागिन्यांवर नाईक पतीपत्नीचा डोळा होता त्यांनी सदर दागिने कडलग यांच्या नकळत २२ सप्टेंबर २०१८ चे सुमारास चोरले व हळूच आपला गाशा तेथून गुंडाळला. दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आल्यानंतर कडलग कुटूंबाची पाचावर धारण बसली व त्यांच्यापुढे बहिणीच्या लग्नाचा यक्ष प्रश्‍न उभा राहिला. महेश कडलग यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान या घटनेतील आरोपींना यापूर्वी अटक केली होती परंतु . दागिने परत मिळाले नव्हते दागिने मिळणार नाही अशा मनस्थितीत कडलग होते.

परंतु पोलीस निरिक्षक वासुदेव देसले यांनी या प्रकरणी आरोपी नवनीत मधुकर नाईक व पत्नी स्मिता नवनीत नाईक यांच्या घरी मुंबई येथे पोलीस निरिक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक भरत नागरे पोलीस नाईक सचिन शेवाळे, पो.कॉ.थोरात, पो.कॉ.काटे पो.कॉ राम खारतोडे,महिला पोलीस नाईक बनकर हा पोलीस फौजफाटा पाठवून चौकशी केली व आरोपींकडून साडेपाच लाखाचे १२ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले व या दाम्पत्यास अटक करण्यात आली. सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार असून अशा प्रकारचे डल्ले या दाम्पत्त्याने कुठे कुठे मारले याचा पोलीस शोध घेत आहे.

पोलीस निरिक्षक वासुदेव देसले यांनी महेश कडलग व त्यांच्या आईं शारदा यांना बोलावून सदर १२ तोळयाचे सोन्याचे दागिने त्यांचेकडे सुपूर्द केले त्याबद्दल कडलग कुटूंबियांनी पोलीसांचे धन्यवाद मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page