आत्मा मालिकच्या क्रिकेट मैदान;  अभिज्ञान कुंडूच्या १४५ चेंडूत ३७ चौकार, ३६ नाबाद विक्रमी  ४०८ सर्वोच्च धावा

आत्मा मालिकच्या क्रिकेट मैदान;  अभिज्ञान कुंडूच्या १४५ चेंडूत ३७ चौकार, ३६ नाबाद विक्रमी  ४०८ सर्वोच्च धावा

The soul owner’s cricket ground; Abhijnan Kundu’s  off 145 balls, 37 Four,Six36 not out, record 408 highest runs

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon20 Dec.2021 18.30Pm.

कोपरगाव : मुंबईचा आघाडीचा फलंदाज अभिज्ञान कुंडूने १४५ चेंडूत ३७ चौकार, ३६ उत्तुंग षटकार ठोकत वैयक्तिक ४०८ विक्रमी धावा करत सांघिक ५४४ धावा फलकावर लावल्या.

 अविनाश साळवी फाउंडेशनच्या अभिज्ञान कुंडूचे हे त्याच्या कारकिर्दीतले ८१ वे शतक होते. आत्तापर्यंत त्याने ७ द्विशतक, व १११ हाफ सेंचुरी केलेल्या आहेत. वयाच्या अवघ्या ६ वर्षी आत्मा मालिक क्रिकेट अकॅडमीच्याच मैदानावर क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या कुंडूने अल्पावधीतच उत्तुंग यश मिळवले आहे.

दिनांक : १८ डिसेंबर ते  २१ डिसेंबर दरम्यान आत्मा मालिक क्रिकेट ॲकॅडमीद्वारे १६ वर्ष वयोगट व १९ वर्षे वयोगटाच्या महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेत आंध्रप्रदेशचे दोन संघ, अविनाश साळवी फाऊंडेशन मुंबईचा संघ, महाराष्ट्र वॉरियर व आत्मा मालिकचे संघ सहभागी झालेले आहेत. उदघाटनीय सामना १६ वर्षीय आंध्रप्रदेशचा संघ व अविनाश साळवी फाउंडेशन, मुंबई संघादरम्यान झाला.

दिनांक १९ डिसेंबर रोजी मर्यादित ४० षटकांच्या या सामन्यात अविनाश साळवी फाउंडेशन, मुंबई संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. मुंबईचा आघाडीचा फलंदाज अभिज्ञान कुंडूने १४५ चेंडूत ३७ चौकार, ३६ उत्तुंग षटकार ठोकत वैयक्तिक ४०८ विक्रमी धावा करत सांघिक ५४४ धावा फलकावर लावल्या. प्रत्युत्तरादाखल आंध्रप्रदेशच्या १६ वर्षीय संघ सर्व गडी बाद १३८ करू शकला. मुंबईने हा सामना ४०६ धावांनी जिंकला. 

आत्मा मालिकमध्ये क्रिकेटची मुहूर्तमेढ रोवणारे मुंबईचे चेतन जाधव हे कुंडूचे प्रशिक्षक आहेत. आत्मा मालिकच्या मैदानावर आत्तापर्यंत कोणत्याच खेळाडूने एवढी मोठी वैयक्तिक धावसंख्या उभारलेली नाही. म्हणून कुंडूची ही अविस्मरणीय खेळी मानली जाते.        

मैदान क्रमांक २ वर १९ वर्षाखालील आंध्रप्रदेशचा संघ व महाराष्ट्र वॉरियर संघ यांच्यात दुसरी भिडत सुरू होती. या सामन्यात देखील  महाराष्ट्र वॉरियर संघाच्या नाशिक येथील अनिकेत गायकवाड खेळाडूने ९९ चेंडूत १२ चौकार व ३ षटकार ठोकत नाबाद ११० धावांची शतकीय  खेळी करत संघाला मर्यादित ३० षटकात २२७ धावावर नेऊन पोहचविले. या सामन्यात देखील आंध्रप्रदेश संघ सर्वबाद २०५ धावा करत २२ धावांनी पराभूत झाला. सामन्याच्या उदघाटन प्रसंगी आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी ए. रामचंद्र, मुंबईचे चेतन जाधव, आंध्रप्रदेशचे प्रशिक्षक महेश, नाशिकचे उद्योजक संजय गायकवाड उपस्थित होते. आत्मा मलिक ध्यानपीठ ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी अभिज्ञान कुंडूला भविष्याच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.         

स्पर्धेचे पंच म्हणून प्रशांत शर्मा व श्रीकांत चौधरी यांनी काम पाहिले. संदीप बोळीज यानी आयोजक म्हणुन काम पाहिले.

Leave a Reply

You cannot copy content of this page