निळवंडे व दारणा दोन्हीकडचे पाणी मिळण्याचा ठराव मंजूर,
भाजप-शिवसेना नगरसेवकांचे आभार – दत्ता काले
Resolution approved to get water from both Nilwande and Darna
Thanks to BJP-Shiv Sena corporators – Datta Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue 21 Dec.2021 19.00Pm.
कोपरगाव : शहारासाठी अतिशय ऐरणीवर असलेला पाणी प्रश्न सुटण्यासाठी निळवंडे व दारणा या दोन्ही धरणावरील आरक्षित पिण्याच्या पाण्याचा हक्क सोडू नये व या दोन्ही ठिकाणांहून कोपरगावसाठी पाणी मिळावे, असा ठराव कोपरगाव नगरपरिषदेच्या अंतिम सर्वसाधारण सभेत करण्यात आला. त्या ठरावास भाजपा-शिवसेना-आरपीआय नगरसेवकांनी बहुमताने मंजुरी दिल्याबद्दल भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले यांनी व शहरवासीयांनी आभार मानले आहे.
कोपरगाव शहराचे वर्तमान व भविष्यात असणारे पाण्याचे नियोजन गृहीत धरून भाजपचे प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी अथक प्रयत्नातून निळवंडे शिर्डी कोपरगाव पाणी योजना मंजूर करून आणलेली होती. २६५ कोटी रुपयांची ही योजना कोपरगाव नगरपालिकेला एक रुपया खर्च न करता मोफत होणार असून यासाठी असणारी २६ कोटी रुपये लोकवर्गणीची रक्कम माफ केली हाती.
अलिकडेच पाच नंबर साठवण तलाव तांत्रिक मंजुरीमध्ये निळवंडे धरणावर कोपरगाव शहरासाठी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण हक्क सोडण्याची जाचक अट महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने घातली होती. या गोष्टीचा विचार करून कोपरगाव नगरपरिषदेची अलीकडेच सर्वसाधारण सभा पार पडली. त्यात निळवंडे व दारणा असे दोन्हीकडून पाणी मिळावे हा ठराव पारित करून भाजपा शिवसेना नगरसेवकांनी कोपरगाव शहरासाठी दोन्हीकडील पाणी सुरक्षित ठेवण्यात मोलाची भूमिका बजावल्याबद्दल सर्व नगरसेवकांचे शहरवासीयांच्या वतीने आभार मानले असल्याचे दत्ता काले शेवटी म्हणाले.