पाटबंधारे विभागाच्या भोंगळ कारभाराविरूध्द शेतकरी दावा ठोकणार- भगीरथ होन

पाटबंधारे विभागाच्या भोंगळ कारभाराविरूध्द शेतकरी दावा ठोकणार- भगीरथ होन

Farmers will file a complaint against the mismanagement of the Irrigation Department – Bhagirath Hoon

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue 21 Dec.2021 19.20Pm.

कोपरगाव : तालुक्यातील चांदेकसारे डाऊच खुर्द या परिसराला हरिसन ब्रँच चारी द्वारे शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळते. मात्र शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता पाटबंधारे विभागाने या परिसरातील हरीसन ब्रँच चारीला असणारी पोट चारी एच बी वन बंद केली परिणामी शेतकऱ्यांना ७ नंबर फार्म भरूनही शेतीला पाणी मिळाले नाही. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पाटबंधारे विभागाच्या विरोधात शेतकरी एकत्रीत दावा दाखल करणार असल्याची माहिती चांदेकसारे येथील सामाजिक कार्यकर्ते भगीरथ होन यांनी दिली.

गोदावरी उजव्या कालव्यावरील शेतकऱ्यांनीरब्बी पिकाच्या पाण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे ७ नंबर फार्म भरून मागणी केली होती.या शेतकऱ्यांना पाणी देणे ही पाटबंधारे विभागाची जबाबदारी होती मात्र या परिसरात चाऱ्यांची दुरुस्ती नसल्याचे कारण दाखवत पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले एकीकडे रोहित्र बंद ठेवून वीज वितरण कंपनीची पठाणी वसुली सुरू आहे तर दुसरीकडे पाटबंधारे विभागाच्या भोंगळ कारभारामुळे ७ नंबर फार्म भरूनही पाणी मिळत नाही त्यामुळे डाऊच खुर्द चांदेकसारे परिसरातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. आहे असा आरोप होन यांनी पत्रकातून केला आहे शिर्डी सिन्नर महामार्गाचे काम या परिसरात चालू असल्याने चाऱ्यांची मोडतोड झाली होती. मात्र मागणी अर्ज आल्यानंतर शेतकऱ्यांना या बाबत कल्पना पाटबंधारे विभागाने द्यायला हवी होती.तसेच संबंधित काम करणाऱ्या ठेकेदारांकडून आधी शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी चाऱ्या करण्याची जबाबदारी महामार्गाकडे सोपवण्यात यायला हवी होती मात्र तसे घडले नाही. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान पाटबंधारे खात्याच्या ढिसाळ नियोजनामुळे झाले आहे.मागणी अर्ज व भरूनही पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांना एकत्रित करून नुकसान भरपाईसाठी पाटबंधारे विभागाच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करणार असल्याचे भगीरथ होन यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page