घारी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ९० टक्के मतदान शांततेत

घारी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ९० टक्के मतदान शांततेत

90% voting in Ghari Gram Panchayat by-election peaceful

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue 21 Dec.2021 19.30Pm.

कोपरगाव : तालुक्यातील घारी येथील ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक ३ मध्ये पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी (२१) ३५९ मतदारांपैकी ३२४ महिला व पुरुष अशा ९० टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान शांततेत पार पडले. आज बुधवारी (२२) रोजी कोपरगाव तहसील कार्यालयाच्या इमारतीमध्ये मतमोजणीचा निकाल जाहीर होणार आहे.

घारी ग्रामपंचायतीची निवडणूक मागच्या वर्षी पार पडली होती. कोरोनाच्या लाटेमध्ये ग्रामपंचायतीचे प्रभाग नंबर ३ मधील सदस्य शांतीलाल जयवंत पवार यांचा कोरोनाने मृत्यू झाला. रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक घेण्यात आली. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी प्रयत्न केले. माजी आमदार स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगत मयत झालेल्या सदस्याच्या घरातील उमेदवारांला प्रतिस्पर्धी उमेदवार उभा करू नये. असे आवाहन केले होते.

कोल्हे गटाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळे गटाच्या उमेदवाराला प्रतिस्पर्धी उमेदवार दिला नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित झाले होते.मयत शांतीलाल पवार यांच्या घरातील आणखीन तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे सहानुभूती म्हणून त्यांच्या घरातील उमेदवार बिनविरोध निवडून द्यावा अशी ग्रामस्थांची इच्छा होती. मात्र अपक्ष उमेदवार म्हणून किसन विठ्ठल पवार यांनी याच प्रभागात आपला निवडणुकी अर्ज भरल्याने काल निवडणुकीचे मतदान पार पडले. आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संदीप रंगनाथ पवार हे या निवडणुकीत उभे आहेत. तर अपक्ष म्हणून किसन विठ्ठल पवार हे पुन्हा एकदा निवडणुकीला उभे राहिले आहे.

तहसीलदार विजय बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीच्या मतदानाचे कामकाज ग्रामसेवक जालिंदर पाडेकर, केंद्र अध्यक्ष किशोर कदम ,सिद्धांत भागवत, संभाजी वाळुंज, अर्चना शहाणे, संदीप बर्डे पहात होते.तर कोपरगाव तालुका ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक महेश कुसारे , श्री काळे, श्री सानप पोलीस पाटील मीराताई रोकडे डॉ. गोरखनाथ रोकडे चोख बंदोबस्त बजावला होता.

Leave a Reply

You cannot copy content of this page