कोपरगाव शहर शिवसेनेची कार्यकारीणी बरखास्त; नवीन कार्यकारीणी लवकरच-शहरप्रमुख दडियाल

कोपरगाव शहर शिवसेनेची कार्यकारीणी बरखास्त; नवीन कार्यकारीणी लवकरच-शहरप्रमुख दडियाल

Kopargaon city Shiv Sena executive dismissed; The new executive will soon be the mayor

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed 22 Dec.2021 19.30Pm.

 कोपरगाव : कोपरगाव नगरपालिकेची निवडणुक तोंडावर असताना शहर प्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी बुधवारी (२२) डिसेंबर जुनी शहर कार्यकारिणी बरखास्त केल्याचे प्रसिद्धीपत्रक जारी केले. यात त्यांनी उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले आहे. लवकरच नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात येईल असेही दडियाल त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

शिवसेनेच्या दृष्टीने कोपरगाव नगरपालिका महत्त्वाची असल्याने पदाधिका-यात फेरबदल करणे गरजेचे आहे. जेणेकरून महत्वाची जबाबदारी कार्यकर्त्यांना देता येईल त्यामुळे उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख अशी सर्व स्तरावरील कार्यकारिणी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली बरखास्त करण्यात आली आहे. अशी माहिती दडियाल यांनी पत्रकातून दिली आहे. शहरात तरुण वर्ग शिवसेनेत प्रवेश करीत आहे. प्रामाणिक कार्यकर्ते व तरुण यांना घेऊन नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल असेही त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page