कोपरगावसाठी निळवंडे व दारणा असे दोन्ही कडील पाणी आरक्षण कायम ठेवावे!
Water reservations for Kopargaon from both Nilwande and Darna should be maintained!
भाजप शिवसेना नगरसेवकांचे विभागीय आयुक्तांना निवेदनBJP Shiv Sena corporator’s statement to divisional commissioner
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu 23 Dec.2021 19.30Pm.
कोपरगा़व : कोपरगावसाठी निळवंडे व दारणा असे दोन्ही कडील पाणी आरक्षण कायम ठेवावे,अशा आशयाचे निवेदन भाजप व शिवसेना नगरसेवकांच्या वतीने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे हे बुधवारी कोपरगांव तालुका दौ-यावर आले असता त्यांना दिले.
कोपरगांव शहराला सध्या ८ तर उन्हाळ्यात १५ ते २० दिवसाआड पाणी मिळते ते शहरवासियांना दररोज पिण्यांसाठी पाणी मिळाले पाहिजे त्यासाठी भाजपाच्या तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी युती शासनाकडून निळवंडे शिर्डी कोपरगांव अशी २६० कोटी रूपये खर्चाची बंदिस्त पाईपलाईन योजना मंजूर करून आणली, त्याचे काम साईबाबा संस्थान शिर्डी करणार आहेत या याजनेसाठी भरावा लागणारा पुर्नस्थापना खर्चही माफ करण्यात आलेला आहे, आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या कोपरगाव नगरपरिषदेवर या योजनेचा आर्थिक बोजा पडणार नाही., तसेच शासनालाही यासाठी पैसे खर्च करावे लागणार नाही. तर दुसरीकडे पाचव्या साठवण तळयात पाणी घेतांना निळवंडेच्या पाण्यांवरील हक्क सोडावा अशी जाचक अट महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने घातली होती. तेंव्हा कोपरगांवशहरवासियांना अशा अटी घालुन त्यांना त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित ठेवु नये. शहरवासियांना दारणेचे आणि निळवंडेचे असे दोन्ही ठिकाणहुन पिण्यांसाठी पाणी मिळालेच पाहिजे, त्याचे सध्याचे मंजुर असलेले आरक्षण कायम ठेवावे,या दोन्ही योजनेमुळे कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सुटण्यास निश्चित मदत होणार आहे. असे विभागीय आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
चौकट-
कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नावर बोलताना आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी निळवंडे-शिर्डी-कोपरगाव बंदिस्त पाईपलाईन योजनेवर लक्ष वेधून या योजनेच्या कामास गती देऊन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.





