कोपरगाव चे  रितेश रणधीर एसीपी पहिली नियुक्ती झारखंडला

कोपरगाव चे  रितेश रणधीर एसीपी पहिली नियुक्ती झारखंडला

Kopargaon’s Riteish Randhir ACP first appointed to Jharkhand

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu 23 Dec.2021 19.20Pm.

कोपरगाव चे  रितेश रणधीर एसीपी पहिली नियुक्ती झारखंडला कोपरगाव प्रतिनिधी: कोपरगाव तालुक्यातील भुमी पुत्र रितेश रणधीर यांची एसीपी म्हणून प्रथम नियुक्ती झारखंड येथे झाली आहे. त्यांच्या नियुक्तीचे तालुक्यातून स्वागत होत आहे.

रितेश रणधीर हे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ए.सी.पी परीक्षा उत्तीर्ण झालेनंतर प्रशिक्षणासाठी गुडगांव (हरियाणा) येथे एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी गेले होते. दि २३/२२/२०२१ रोजी  त्यांचे प्रशिक्षण पुर्ण होत असून..त्यांचा दिक्षांत समारंभ उद्या होत आहे… रणधीर यांचे  शिक्षण कोपरगाव येथील सेवानिकेतन,एस.एस.जी.एम.काॅलेज, इंग्लंड येथे झाले आहे.

त्यांचे वडील डॉ.सुभाष रणधीर सर हे कोपरगाव येथील एस.एस.जी.एम. महाविद्यालय उपप्राचार्य असून त्यांची आई कोपरगाव येथील जुने कोपरे घराण्यातील आहे… सध्या हे कुटुंब कोपरगाव शहरातील साईनगर येथे रहाते…त्यांची पहिली नियुक्ती झारखंड येथे होत आहे. त्यांच्या नियुक्तीचे कोपरगाव तालुक्यात स्वागत होत आहे व त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page