ब्रम्हलिन संत रामदासी महाराजांचा ३२ वा पुण्यतिथी सोहळा

ब्रम्हलिन संत रामदासी महाराजांचा ३२ वा पुण्यतिथी सोहळा

32nd Punyatithi Ceremony of Bramhalin Saint Ramdasi Maharaj

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir 24 Dec.2021 15.00Pm.

कोपरगांव: तालुक्यातील कोकमठाण येथील प. पू. ब्रम्हलिन संत श्री रामदासी महाराज यांच्या ३२ व्या पुण्यतिथी निमीत्त शिवचरित्र कथाकार समाजप्रबोधनकार हभप सर्जेराव महाराज टेके वारीकर यांच्या रसाळ वाणीतून संगीतमय छत्रपती शिवाजी महाराज शौर्यगाथा शिवरायांची कथा व व्यासपिठ चालक हभप तुकाराम महाराज वेलजाळे यांच्या रसाळ वाणीतुन ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन १९ ते २६ जानेवारी पर्यंत करण्यात आले असल्याची माहिती समस्त रामदासी बाबा भक्त मंडळ तिर्थक्षेत्र कोकमठाण येथील गांवक-यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात दिली.

 २६ जानेवारी रोजी त्रंबकेश्वर येथील आनंद आखाडयाचे श्री श्री १००८ गणेशानद सरस्वती महाराज, सज्जनगडाचे माजी व्यवस्थापक व खातगांव कर्जतचे कार्याध्यक्ष समर्थभक्त मोहनबुवा रामदासी, आनंद आखाडाचे स्वामी सागरानंद सरस्वती महाराज आदि संत महतांच्या प्रमुख उपस्थितीत सरालाबेटाचे उत्तराधिकारी महंत रामगिरी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने याची सांगता होईल.             

रामदासीबाबा भक्त मंडळाने प्रसिध्दास दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, या सप्ताह काळात पहाटे ४ ते ६ काकडआरती, सकाळी ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ५ ते ६ सामुदायिक हरिपाठ व रात्रौ ९ वाजता शौर्यगाथा शिवरायांची कथा व दैनदिन जागर याप्रमाणे कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांसाठी सिंथेसायजर हभप अरुण भैय्या पगारे, तबला हभप सोपान महाराज तळेकर, पॅड हभप अतुल महाराज शिंदे, वेषभूषाकार हभप दिलीप महाराज खळदकर यांची साथ लाभणार आहे.            

 १९ जानेवारी रोजी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख विश्वस्थ प पू रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते कलश व ग्रंथ पुजनाने या पुण्यतिथी सोहळयाचा शुभारंभ होत आहे. २५ जानेवारी रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत प. पू. रामदासी महाराज यांची प्रतिमा व ग्रंथ मिरवणुक काढण्यात येणार आहे.

या सप्ताह काळात ह भ प सागरानंद महाराज (त्र्यंबकेश्वर) स्वामी शिवानंदगिरी महाराज (मंजुर), जंगलीदास माऊली, रमेशगिरी महाराज (कोपरगाव बेट). रामानंदगिरी महाराज (पुणतांबा), अरविंद महाराज, गणेशानंद महाराज (जालना), राघवेश्वरानंद महाराज कुंभारी, रामदास महाराज वाघ, भगवतानंदगिरी महाराज (कोकमठाण), महेंद्रपुरी महाराज (हनुमान टेकडी) मुकुंद महाराज (भगुरकर), श्रध्दानंद महाराज (महांकाळ वाडगाव), विठठलानंद महाराज (कारवाडी) गणपत महाराज लोहाटे (कोपरगाव) आदि संत-महंताची -प्रामुख्यांनी उपस्थिती राहणार आहे. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचक्रोशीतील भजनी मंडळ व कोकमठाण येथील रामदासी बाबा भक्त मंडळ प्रयत्नशील आहेत. २६ जानेवारी रोजी महेश विजयराव गायकवाड यांच्या हस्ते रामदासी महाराजांच्या मूर्तीस लघुरुद्राने महामस्तकाभिषेक करण्यात येणार आहे, तरी जास्तीत जास्त भाविकांनी या सर्व कार्यक्रमास यथाशक्ती सहकार्य करावे असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page