अंतर विद्यापीठ पश्चिम विभाग व्हाॅलीबाॅल (मुली) स्पर्धेत पुणे विद्यापीठ संघ प्रथम
Pune University team first in Inter University West Division Volleyball (Girls) Competition
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir 24 Dec.2021 15.20Pm.
कोपरगाव: संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज आयोजीत व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रायोजीत पश्चिम विभागीय अंतर विद्यापीठ व्हाॅलीबाॅल (मुली) स्पर्धेच्या चार दिवस चाललेल्या अटितटीच्या सामन्यांमध्ये सावित्रीबाई फुले,पुणे विद्यापीठ या संघाने प्रथम क्रमांक मिळविला.
तर स्वर्निम गुजरात स्पोर्टस् युनिर्वसिटी, गांधीनगर,गुजराथ संघाने दुसरा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपुर संघाने तिसरा व लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ फिजिकल एज्युकेशन युनिर्वसिटी , ग्वालियर, मध्यप्रदेश संघाने चौथा क्रमांक पटकाविला.
उत्कृष्ट खेळाडूंमध्ये बेस्ट लिबेरो वर्गवारीमध्ये पुणे विद्यापीठाची भुमिका पोमण व बेस्ट अटॅकर वर्गवारीमध्ये श्रृती म्हशाळे, बेस्ट सेटर वर्गवारीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाची, वैष्णवी ढोबळे आणि बेस्ट ऑलरावुंडर वर्गवारी मध्ये स्वर्निम गुजरात स्पोर्टस् युनिर्वसिटीची, वालाकिंजल बेन यांनी बहुमान पटकाविला. वरील सर्व संघांना व उत्कृष्ट खेळाडूुंना मान्यवरांच्या हस्ते ट्राफी व प्रमाणपत्रांचे वितरण सन्माण पुर्वक करण्यात आले.
यावेळी पुणे खेळ आणि शारीरिक शिक्षण मंडळाचे डायरेक्टर डाॅ. दिपक माने म्हणाले, मनुष्याला रोगांपासुन दूर राहण्यासाठी निरोगी शरीर असणे आवश्यक आहे. एका निरोगी शरीरातुन निरोगी मन व बुध्दीचा विकास होतो. खेळ खेळल्याने मनुष्यात धैर्य, सहनशिलता आणि माणवी गुणांचा विकास होतो. खेळ आजच्या व्यस्त जीवनात महत्वाची भुमिका बजावते. खेळ खेळल्याने तंदुरूस्ती सोबत मनोरंजनही होते. खेळाडूंनी जे खेळ खेळत नाही, त्यांना खेळाच्या प्रवाहात आणावे, असे त्यांनी यावेळी सांगितले. डॉ. माने यांनी त्यांनी आपल्या भाषणात संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या नियोजनाचे कौतुक केले.
बक्षीस वितरणप्रसंगी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, विश्वस्त सुमित कोेल्हे, पुणे विद्यापीठाचे सेक्शन ऑफिसर प्रा. मनोहर कुंजिर, सचिव ए. डी. अंत्रे, माजी राष्ट्रीय व्हाॅलीबाॅल खेळाडू श्री सुभाष पाटणकर, जिमखाना प्रमुख डी. एन. सांगळे, टेक्निकल टीमचे सर्व सदस्य उपस्थित होते.
महाराष्ट्र , गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश व गोवा राज्यातील सुमारे ४५ विद्यापीठांच्या मुलींच्या व्हाॅलीबाॅल संघाने या सामन्यांसाठी हजेरी लावुन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
एकुण १६ पंचांनी काम पाहीले.
याप्रसंगी नितीन कोल्हे व ए. डी. अंत्रे यांनी चारही संघांना भुवनेश्वर येथे आखिल भारतीय पातळीवर होणाऱ्या सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धा यशस्वी करण्यासठी विशेष अधिकारी श्री प्रकाश जाधव, फिजिकल डायरेक्टर्स प्रा. गणेश नरोडे, प्रा. शिवराज पाळणे व प्रा. योगेश अव्हाड यांनी मोलाची भुमिका निभावली.
प्रा. साहेबराव दवंगे यांनी सुत्र संचालन केले तर श्री डी. एन. सांगळे यांनी आभार मानले.
Post Views:
388