उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत पतसंस्था ठेव विमा योजना राबविण्याचा निर्णय – काका कोयटे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत पतसंस्था ठेव विमा योजना राबविण्याचा निर्णय – काका कोयटे

Decision to implement credit union deposit insurance scheme in the meeting of Deputy Chief Minister Ajit Pawar – KAKA KOYATE

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir 31Dec.2021 19.30Pm.

कोपरगाव: केरळच्या ठेव विमा संरक्षण व अहमदनगर जिल्ह्यातील लिक्विडीटी बेस प्रोटेक्शन फंड यांचा एकत्रितपणे अभ्यास करून पतसंस्था ठेव विमा योजना राबविण्याचा निर्णय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार आयुक्त अनिल कवडे, व महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या पुणे शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

बैठकीस महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.सुरेखा लवांडे, स्विकृत संचालक राजेंद्र कांचन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे हे उपस्थित होते.

प्रसिद्धी पत्रकामध्ये पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्याबरोबर पुणे जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांच्या थकबाकीदारांच्या स्थावर मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी अंदाजे सहा हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. या बाबत देखील चर्चा करण्यात आली. या बाबत पतसंस्थांना महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० चे कलम १०१ प्रमाणे वसुली दाखला मिळाल्या बरोबर प्रतीकात्मक ताबा घेता येईल व सहकार खात्याच्या वतीने त्वरित अपसेट प्राईस दिली जाईल याबाबतचे परिपत्रक काढण्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी मान्य केले. या परिपत्रकाचा उपयोग महाराष्ट्रातील सर्वच पतसंस्थांना होईल अशी अपेक्षा काका कोयटे यांनी व्यक्त केली.

उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णायक क्षमतेमुळे पुणे जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांच्या थकबाकीदारांच्या स्थावर मालमत्ता ताब्यात घेण्याबाबत गत दोन वर्षापासून रेंगाळलेले प्रश्न सुटला आहे. पुणे जिल्ह्यातील सहकारी पतसंस्था चळवळीत समाधानाचे वातावरण पसरले आहे असे उरुळी कांचन येथील डॉ.मणिभाई देसाई पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र कांचन यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासनाकडे हि पतसंस्थांची गुंतवणूक करता येईल का? याचा अभ्यास करण्याचे तसेच दहा हजार कोटींच्या पुढे असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत अतिरिक्त गुंतवणूक करण्याबाबत देखील अभ्यास करणे, मुंबई मंत्रालय येथे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार राज्य मंत्री विश्वजित कदम सहकार सचिव व सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्या उपस्थित तातडीने बैठक लावण्याची सूचना ना.अजित पवार यांनी सहकार आयुक्त अनिल कवडे यांना दिली.

Leave a Reply

You cannot copy content of this page