जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची कोपरगाव दुय्यम कारागृहाला सरप्राईज भेट

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची कोपरगाव दुय्यम कारागृहाला सरप्राईज भेट

District Superintendent of Police Manoj Patil’s surprise visit to Kopargaon Secondary Jail

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir 31Dec.2021 19.40Pm.

कोपरगाव :  जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज अचानक कोपरगाव येथे दुय्यम कारागृहाला अचानक सरप्राईज भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले होते.

श्री पाटील यांनी कारागृहात जाऊन बराकीची पाहणी करून कैद्यांच्या काय समस्या आहेत त्या जाणून घेतल्या.                   

 येथील तुरुंगात सध्या ५६ कैदी आहेत . श्री पाटील यांनी भेट दिली त्या वेळेस गार्ड अंमलदार म्हणून डमाळे तमनर शिंदे व मोरे उपस्थित होते .या वेळी कैद्यांनी ही तक्रारी केल्याचे समजते.                 

  दुय्यम कारागृहाचे अधीक्षक चंद्रशेखर कुलथे यांनी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना लेखी पत्र दिले असून त्यात म्हटले की, कोपरगाव सब जेल मध्ये शहर पोलीस स्टेशन, तालुका पोलीस स्टेशन, शिर्डी पोलीस स्टेशन, राहाता पोलीस स्टेशन व लोणी पोलीस स्टेशन अशा एकूण पाच पोलीस ठाण्याचे न्यायालयीन चौकशी तील कैद्यांना या कारागृहात ठेवले जाते.                                       

 कोपरगाव सब जेल मधील कैदी त्यांचे आरोग्य चांगले राहण्याच्या दृष्टीने सब जेलमध्ये कैद्यांची नियमित तपासणी करून त्यांच्यावर आवश्‍यक उपचार करण्यात यावा covid-19 बाबतच्या नियमित तपासण्या करणेकामी दर आठवड्यातून एकदा नियमितपणे भेट देऊन कैद्यांवर आवश्यक तो औषधोपचार करणेकामी वैद्यकीय अधिकारी यांच्या भेटीबाबत चे वेळापत्रक दुय्यम कारागृह सादर करण्यात यावे तसेच सब जेल मध्ये एक प्रथमोपचार पेटी ठेवण्यात यावी असे पत्र दिले होते, त्या पार्श्वभूमी वर ही भेट असल्याचे शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी सांगितले.                                       

देशाचे गृहमंत्री अमित शहा लोणी शिर्डी दौऱ्यावर असताना राहुरी येथील दुय्यम कारागृह तुन पाच कैद्यांनी पलायन केले होते. त्या पार्श्वभूमीवर ही येथील तुरुंग प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश घेऊन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी विविध सूचना दिल्याचे समजते.

Leave a Reply

You cannot copy content of this page