५ नंबर तलावाच्या १२३ कोटी खर्चाला प्रकल्प मान्यता समितीची मंजुरी -आ. आशुतोष काळे
Project approval committee approves Rs 123 crore cost of Lake No. 5 Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon 3Jan.2022 19.40Pm.
कोपरगाव : शहरातील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या साठवण तलाव क्रमांक ५ साठी १२३ कोटी रुपये खर्चाला प्रकल्प मान्यता समितीच्या बैठकीत प्रकल्प मान्यता समितीने एकमताने मंजुरी दिली असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
आ. आशुतोष काळे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतील आश्वासनांप्रमाणे शहरातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्यासाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या पाच नंबर साठवण तलावाच्या प्राथमिक खोदायचे काम दोनच महिन्यात सुरु केले होते त्यापुढील साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १२३ कोटी रुपयांच्या खर्चाला तांत्रिक मंजुरी देखील मिळविली होती. या मंजुरीला प्रशासकीय मंजुरी मिळवून निधी उपलब्ध व्हावा यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता या पाठपुराव्याची दखल घेऊन सोमवारी (३) जानेवारी रोजी सकाळी नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई येथे झालेल्या प्रकल्प मान्यता समितीची बैठकीत पाच नंबर साठवण तलावाच्या १२३ कोटी रुपये निधीला प्रकल्प मान्यता समितीने एकमताने मंजुरी दिली आहे.
या बैठकीस आ.आशुतोष काळे नगरपरिषद प्रशासन संचालयानाचे संचालक गावडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता नंदनवारे,नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, सहसचिव पांडुरंग जाधव, नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम गोसावी आदी उपस्थित होते.
चौकट:- पाच नंबर साठवण तलावासाठी एकमताने १२३ कोटी रुपयांची मंजुरी मिळवून आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहर वासियांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.





