कोपरगावात सोमवारी आठवडे बाजारात भर दुपारी तरुणाचा खून
Murder of a youth in Kopargaon on Monday afternoon
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon 3Jan.2022 19.30Pm.
कोपरगाव: कोपरगाव शहरात सोमवारी (३ जानेवारी) रोजी आठवडे बाजारात भर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ७ ते ८ जणांनी रॉड, फावड्याचा दांडा, गज व दगडाने ठेचून मारहाण करुन पस्तीस वर्षाच्या तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे.
राजा भोसले (३५) असे या खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो शिंगणापूर येथील रहिवासी आहे. मयत राजा भोसले याला शहरातील संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले आहे. या तरुणाला सात-आठ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली व दोन मोटारसायकली तेथेच सोडून पोबारा केला. कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींचा शोध घेण्यासाठी शहर पोलिसांची पथके चौफेर रवाना झाली असल्याचे समजते.
सोमवार हा कोपरगाव शहराचा आठवडी बाजार असतो या बाजारामध्ये दुपारच्या वेळेस मोठ्या प्रमाणात गर्दी असते ज्या ठिकाणी घटना घडली तो बाजार तळाच्या मध्यवर्ती भागास खेटून जुन्या काले इमारतीच्या पश्चिम बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत हा प्रकार घडला आहे.भर दिवसा आठवडे बाजाराच्या भर गर्दीत या आजच्या खुनाच्या घटनेमुळे संपूर्ण कोपरगाव शहर हादरले आहे.