सहकार महर्षी कोल्हे कारखान्याला “उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता” पुरस्कार – विवेक कोल्हे

सहकार महर्षी कोल्हे कारखान्याला “उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता” पुरस्कार – विवेक कोल्हे

Sahakar Maharshi Kolhe Factory Awarded “Outstanding Technical Efficiency” – Vivek Kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon 3Jan.2022 19.50Pm.

कोपरगाव : सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यास नुकताच वसंतदादा शुगर इन्स्टीट्युट पुणे यांनी गळीत हंगाम २०२० –२१ करीता उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा तृतीय क्रमांकाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केला अशी माहिती कारखान्याचे तज्ञ संचालक विवेक कोल्हे यांनी दिली.

विवेक कोल्हे म्हणाले माजी  मंत्री शंकरराव कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे चेअरमन बिपीन कोल्हे यांचे कुशल नेतृत्वाखाली आजपर्यंत कारखान्याने अनेक नविन उपक्रम राबविलेले असुन देशात सर्व प्रथम केमिकल व औषधी प्रकल्प उभारणी केली आहे. तसेच उस गाळपासह विविध रासायनिक उपपदार्थ,सहवीज निर्मीत आदिबाबत नावलौकीक कामगिरी केलेली आहे. कारखान्याने सन२०२० – २१ मध्ये उस गाळप क्षमता वापर १०१.४२ टक्के असुन साखर उतारा १०.९० टक्के इतका होता. मागील दोन वर्षाचे तुलनेत साखर उताऱ्यात ०.५७ टक्कयांनी वाढ झालेली आहे. त्याचाच भाग म्हणुन सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेली संस्था वसंतदादा शुगर इन्स्टीट्युट पुणे यांनी कारखान्यास उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्काराने सन्मानीत केले आहे.

विवेक कोल्हे  म्हणाले  की, या पुरस्कारामध्ये माजी मंत्री शंकरराव कोल्हे साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन तसेच चेअरमन बिपीन कोल्हे यांचे कुशल नेतृत्व सर्व संचालक व सभासद बंधु यांची मोलाची साथ तसेच कार्यकारी संचालक बी.जी.सुतार व त्यांचे सर्व व्यवस्थापन समिती, कर्मचारी बंधु व कारखान्याशी संबंधीत असलेले घटक यांनी दाखविलेल्या कार्यक्षमतेमुळेच कारखान्यास उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार मिळाल्याचे यावेळी ते म्हणाले.

Leave a Reply

You cannot copy content of this page