साई तपोभुमी चौक ते रेल्वे स्टेशन रस्त्यावरील विद्युत खांबामुळे अपघाताचा धोका
Risk of accident due to electric pole on Sai Tapobhumi Chowk to Railway Station Road
रस्ता झाला पण जुने विजेचे खांब जैसे थे!The road was paved but it was like an old electricity pole!
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed 5Jan.2022 17.00Pm.
कोपरगाव: यावर्षी साई तपोभुमी चौक ते रेल्वे स्टेशन दरम्यान रस्त्याचे डांबरीकरण व सुशोभीकरण करण्यात आले . सदर रस्त्यात जुन्या रूंद रस्त्यावर विद्युत खांब कडेला होते. नव्याने करण्यात आलेल्या रस्त्याची रूंदी वाढविण्यात आली. त्यामुळे रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या मार्गावरील अनेक वीज खांब रस्त्यावर आले. वीज वितरण कंपनीने रस्त्यावरील विद्युत खांब इतरत्र हलविली नाही.
माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रयत्नातून साई तपोभुमी चौक ते रेल्वे स्टेशन या रस्त्याचे रुंदीकरण व सुशोभीकरण करण्यात आले आहे. सदर रस्त्याचे काम कंत्राटदारामार्फत करण्यात आले. मात्र रस्त्यावर असलेली विद्युत खांब तसेच जुन्याच ठिकाणी कायम ठेवण्यात आले.
वीज वितरण कंपनीने रस्त्यावरील विद्युत खांब इतरत्र हलविले नाही.
सदर रस्त्याचे काम ऑगस्ट महिन्यात कंत्राटदारामार्फत करण्यात आले. त्यानंतर कोरोनाच्या संचारबंदीमुळे वाहतूक ठप्प पडली. कोरोनामुळे सध्या या मार्गावरील वाहनांची वर्दळ कमी आहे. मात्र या रस्त्यावर रेल्वे स्टेशन संजीवनी साखर कारखाना गोदावरी दूध संघ संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज महिला कॉलेज नागरी वसाहत कोपरगाव औद्योगिक वसाहत असल्याने या ठिकाणी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतुकीची व नागरिकांची वर्दळ असते येत्या काही दिवसानंतर कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यावर सदर मार्गावरील वाहतूक वाढली आहे. दरम्यान येथून अवजड वाहतूक होते.अशा परिस्थितीत एस एस जी एम कॉलेज मुलांच्या होस्टेल समोर रस्त्याच्या मधोमध असलेल्या रिकाम्या वीजेच्या खांबामुळे वाहनाची धडक बसून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून ही समस्या असतानाही या गंभीर समस्येकडे नगर परिषद, वीज वितरण कंपनी व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रात्रीच्या सुमारास वाहनाच्या अंधुक प्रकाशात रस्त्यावरील हे वीज खांब स्पष्ट दिसत नाही. वाहनचालकाचे नियंत्रण सुटून वीज खांबाला जोरदार धडक बसून हानी होण्याची शक्यता आहे. शहरातून जाणा-या रेल्वे स्टेशन मार्गावर मोठ्या अपघाताची प्रतीक्षा प्रशासनाला आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे. अपघात झाल्यानंतरच वीज खांब हटवतील का, असा प्रश्न आहे.
चौकट
साई तपोभुमी चौक ते रेल्वे स्टेशन या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने कंत्राटदाराकडे सोपविले. रस्ता बांधकामादरम्यान रस्त्यावरील वीजेचे खांब इतरत्र हलविण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची होती. मात्र त्याने ते हलविण्याकडे दुर्लक्ष केले.- वीज वितरण कंपनी, कोपरगाव