खेळांमुळे विद्यार्थ्याचे व्यक्तीमत्व व गुणांचा विकास होतो- संदीप वर्पे

खेळांमुळे विद्यार्थ्याचे व्यक्तीमत्व व गुणांचा विकास होतो- संदीप वर्पे

Sports develops student’s personality and qualities – Sandeep Warpe

 समता इंटरनॅशनलचा १० वा  क्रीडा महोत्सव10th Sports Festival of Samata International

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue4 Jan.2022 17.40Pm.

कोपरगाव : क्रीडा महोत्सवातील विविध खेळांमुळे विद्यार्थ्याचे व्यक्तीमत्व व गुणांचा विकास होतो. तसेच त्यांची शारीरिकता व मानसिकता वाढीस लागून सर्व गुण संपन्नतेकडे वाटचाल होत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपकार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी समता इंटरनॅशनल क्रीडा महोत्सव प्रसंगी केले.

संदीप वर्पे व समता स्कूलचे मुख्य विद्यार्थी प्रतिनिधी अथर्व बेरगळ आणि विविध विभागाचे विद्यार्थी प्रतिनिधी अनुष्का रोटे, तनिष्का राजेभोसले, कामरान अत्तार, पार्थ गिरवळकर , सुहानी समदाडीया, गणेश गवळी, यांनी मशाल हातात घेऊन क्रीडांगणाला एक फेरा देत क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ केला. ३१ डिसेंबर २०२१ रोजी बक्षिस वितरण मॅनेजिंग ट्रस्टी सौ स्वाती कोयटे आणि पालक प्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आले.

प्रास्ताविकात स्कूलचे मुख्य कार्यवाह संदीप कोयटे म्हणाले की, आज विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणावरील मोबाईलच्या वापरामुळे मैदानी खेळाला लगाम लागला आहे. अशा परिस्थितीत त्यांना प्रोत्साहन देऊन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे,त्यांचा आत्मविश्वास वाढविणे खूप गरजेचे आहे.मुलांना मोबाईल पासून विलग करणे यावर क्रीडा स्पर्धा हा एक उत्कृष्ट उपाय आहे.या दृष्टीनेच समता इंटरनॅशनल स्कूलने १० व्या क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले यामुळे विद्यार्थ्यांना देशातील, परदेशातील खेळांची ओळख होत आहे असे ते म्हणाले,

समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक काका कोयटे, माजी नगराध्यक्षा आणि समताच्या शालेय पोषण आहार समितीच्या अध्यक्षा सौ सुहासिनी कोयटे यांनी यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी मॅनेजिंग ट्रस्टी सौ स्वाती कोयटे, मुख्य कार्यवाह संदीप कोयटे, शैक्षणिक संचालिका सौ लिसा बर्धन, उपप्राचार्य समीर अत्तार यांच्यासह समता पालक प्रतिनिधी सदस्या सौ राधिका शिरोडे,सौ वर्षा डमरे,सौ मधुरा जोशी,सौ वंदना राय,सौ जिग्ना पोरवाल,सौ रोहिणी वक्ते,सौ रोहिणी होन, सौ रुपाली साखरे,सौ आचल गुजराणी,सौ सारिका भुतडा,सौ किरण सोनकुसळे यांची प्रमुख उपस्थिती होती. समता २०२१ चे वार्षिक क्रीडा पारितोषिक समताच्या झेनिथ हाऊसला मिळाले. प्राथमिक विभागातील मुलांमध्ये उत्कृष्ट एथलेटिक म्हणून इ ४ तील आर्किड गट अंश ठोळे तर मुलींमध्ये इ ५ वीतील ट्युलिप गट कृती पहाडे, माध्यमिक विभागातील मुलांमध्ये इ १० वीतील आर्किड गट समर्थ मोरगे तर मुलींमध्ये इ १० वीतील आर्किड गट नंदिनी कलंत्री हिने यश संपादन करत भरघोस बक्षिसे आणि पारितोषिके मिळवली.

विद्यार्थ्यांना क्रीडा विभागप्रमुख रोहित महाले, उत्सव गांधी, शुभम औताडे, इमरान शेख यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

क्रीडा महोत्सवात इ१ली ते १० वीतील सर्व विद्यार्थ्यांनी बास्केट बॉल, क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, टेबल टेनिस, चेस, रिले, रनिंग रेस या क्रीडा प्रकारात सहभागी होऊन यश संपादन केले.यश संपादन केलेले विद्यार्थी आणि विजयी संघांना विविध प्रकारातील बक्षिसे, पारितोषिके आणि सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली.

क्रीडा महोत्सव यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सुत्रसंचालन विद्यार्थी दिव्य आढाव आणि पलक भुतडा यांनी केले तर आभार मुख्य क्रीडा प्रतिनिधी कामरान अत्तार याने मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page